ETV Bharat / state

Maharashtra Poltical Crisis : शिवसेनेचा आठवा मंत्री शिंदेच्या गटाकडे रवाना

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार मंत्री उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सोडुन शिंदे गटात सहभागी होत आहेत. आधिच 7 मंत्री शिंदे गटात पोचले आहेत. आज शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी ला रवाना होण्यासाठी (Shiv Sena's eighth minister leaves for Shinde's group) निघाले आहे.

Uday Samant
उदय सामंत
author img

By

Published : Jun 26, 2022, 3:28 PM IST

Updated : Jun 26, 2022, 4:48 PM IST

रत्नागिरी: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार मंत्री उध्दव ठाकरेंना सोडुन शिंदे गटात सहभागी होत आहेत. आधिच 7 मंत्री शिंदे गटात पोचले आहेत. आज शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामिल होण्यासाठी गुवाहाटी ला रवाना होण्यासाठी निघाले आहे. सामंत च्या जाण्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. सामंत शिवसेना उपनेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. ते गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचा बोर्डिंग पास समोर आला आहे. चार्टर्ड विमानाच्या लिस्ट मधे त्यांचे नाव दिसत आहे.

Boarding pass of Uday Samant
उदय सामंत यांचा बोर्डिंग पास

उदय सामंत हे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर रत्‍नागिरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते मानले जातात. त्यांचा फोन सकाळ पासून नाॅट रिचेबल लागत होता. दोन दिवसापुर्वीही त्यांचा फोन लागत नव्हता तेव्हाही त्यांच्या बद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती तेव्हा त्यांनी मी गुवाहाटीला गेलो नाही गावाकडे आहे असा खुलासा केला होता. काल झालेल्या शिवसेनेच्या बैठकीलाही ते उपस्थित होते.

Uday Samant
उदय सामंत

पाली येथील निवासस्थानी शुक्रवारी उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली होती. कुटुंबीयांशीही चर्चा केली होती. पत्रकारांशी बोलतानाही सामंत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू समजून घेण्याची गरज असल्याचे मत वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामंत नक्की कुठे जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. अशात शनिवारी मुंबईत मातोश्रीवर झालेल्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांच्या बाबत संभ्रम होता.

  • Correction | Uday Samant*, Maharashtra Minister of Higher & Technical Education joins Eknath Shinde faction at Guwahati. He is the 8th minister to join the Shinde camp: Sources pic.twitter.com/cFFt43yEFk

    — ANI (@ANI) June 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही : आदित्य ठाकरे

Last Updated : Jun 26, 2022, 4:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.