ETV Bharat / state

महाआघाडीत बिघाडी? शिवसेना आमदाराचा खासदार तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव - shivsena vs NCP

रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. या प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

author img

By

Published : Oct 24, 2020, 10:43 AM IST

Updated : Oct 24, 2020, 1:00 PM IST

रत्नागिरी - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी- काँग्रेस या तिन्ही पक्षाचे सरकार सत्तेत असताना कोकणात मात्र शिवसेना आमदाराने राष्ट्रवादी खासदाराच्या विरोधात दंड थोपटले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

महाआघाडीत बिघाडी

म्हणून हक्कभंगाचा प्रस्ताव-

आपल्या विधानसभा मतदारसंघात होणार्‍या विकासकामांच्या भूमीपुजनाला आपणास निमंत्रण देत नाहीत. तसेच आपल्याला विश्‍वासात न घेता कार्यक्रम करत असल्याने आमदार योगेश कदम यांनी तटकरे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

याबाबत आमदार योगेश कदम म्हणाले, खा. सुनील तटकरे हे सातत्याने माझ्या दापोली विधानसभा मतदारसंघात मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत आहेत. 12 ऑक्टोबरला मला निमंत्रण न देता त्यांनी दापोली येथील पंचायत समीती सभागृहात शासकीय अधिकार्‍यांसोबत आढावा बैठक घेतली. रायगड रत्नागिरी जिल्हे जोडणारा आंबेत पूल कमकुवत झाल्यामुळे या पुलावरून जड वाहने नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या पुलाच्या पुर्नंबांधणीसाठी आपण प्रयत्न केले तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही संबंधित अधिकार्‍यांच्या या पुलासंदर्भात बैठका घेतल्या होत्या.

वर्क ऑर्डर आधीच जेट्टीच भूमीपूजन, निमंत्रणही नाही-

आंबेत पुलावरून जड वाहने नेण्यास परवानगी नसल्याने ही वाहने महाड मार्गे न्यावी लागतात. त्यामुळे वाहनचालकांना वेळ खर्ची घालण्यासह आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे म्हाप्रळ ते आंबेत दरम्यान फेरी बोट सेवा सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही बाजूला फेरीबोट लावण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झाला आहे. मात्र, या कामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) देण्याअगोदरच खा. सुनील तटकरे यांनी 11 ऑक्टोबर रोजी त्यांचे चिरंजीव आ. अनिकेत तटकरे व माजी आमदार संजय कदम यांना घेऊन या कामाचे भूमीपूजन केले. या कार्यक्रमाचे मला निमंत्रणही देण्यात आले नाही, तसेच या भूमीपुजनाच्या पाटीवर माझे नाव न टाकता खासदार महोदयांनी राष्ट्रवादी पक्षाचाच भूमीपूजन कार्यक्रम केला असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षांकडे कारवाईची विनंती-

ही बाब अतिशय गंभीर असून माझ्या हक्कावर गदा आणण्याचे काम सातत्याने खासदार सुनील तटकरे करत आहेत. त्यामुळे नाइलाजाने आपण 20 ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. खासदार तटकरे यांच्यावर पुढील योग्य कारवाई करण्याची विनंती केली असल्याची माहिती आ. योगेश कदम यांनी दिली. या सर्व प्रकारामुळे आता महाविकास आघाडीतच बिघाडी होण्याची शक्यता आहे. आता दोन्ही पक्षाचे नेते या संदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 1:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.