ETV Bharat / state

Shiv Sena MLA Uday Samant : 'रामदासभाईंचं दुःख आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे'- उदय सामंत

Shiv Sena MLA Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना नक्षलवादी यांची धमकी ( threat ) असताना देखील झेड प्लस सुरक्षा का दिली गेली नाही? याचे उत्तर कदाचित शंभूराजे देसाई ( Shambhu Raje Desai ) देऊ शकतात. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाबाबत सामंत यांना विचारले असता त्यावर ते बोलत होते.

उदय सामंत
उदय सामंत
author img

By

Published : Jul 23, 2022, 6:48 AM IST

रत्नागिरी - रामदास भाई यांनी जे काही दुःख व्यक्त केलं आहे. ते आमच्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे, असे शिवसेना आमदार उदय सामंत ( Shiv Sena MLA Uday Samant ) यांनी म्हटले आहे. रत्नागिरी येथील पाली निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, रामदासभाईंनी शिवसेनेसाठी ( Shiv Sena ) तुरुंगवास देखील भोगलेला आहे. स्वतः चा खर्च करून, पक्ष वाढविण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते. 52 वर्षांचा अनुभव असलेल्या शिवसैनिकाने आपला अनुभव मांडला आहे. तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असे उदय सामंत यांनी यावेळी म्हटले आहे.

उदय सामंत

दरम्यान सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांना नक्षलवादी यांची धमकी ( threat ) असताना देखील झेड प्लस सुरक्षा का दिली गेली नाही? याचे उत्तर कदाचित शंभूराजे देसाई ( Shambhu Raje Desai ) देऊ शकतात. सुहास कांदे यांनी केलेल्या आरोपाबाबत सामंत यांना विचारले असता त्यावर ते बोलत होते. दरम्यान आम्ही अद्याप देखील शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. अशी प्रतिक्रिया देखील यावेळी उदय सामंत ( Shiv Sena MLA Uday Samant ) यांनी दिली आहे.

तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 200 ऐवजी 181 मतं कशी मिळाली? यावर बोलण्यापेक्षा सभागृहामध्ये 109 ची 98 मतं कशी झाली? याचा विचार करावा, असा टोला देखील यावेळी उदय सामंत यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. दरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जे मंत्री होते. असे 9 मंत्री सध्याच्या सरकारमध्ये आहेत. आता तुम्ही ज्या सरकारमध्ये होतात त्या निर्णयाना स्थगिती मिळत आहे. याचा अर्थ तुम्ही त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे होते का? ज्या सरकारला तुम्ही पाठिंबा दिलाय त्याच सरकारने तुम्ही घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली आहे, तेव्हा तुम्ही गप्प का? असे भास्कर जाधव म्हणाले होते.

याबाबत बोलताना आमदार उदय सामंत म्हणाले की, भास्कर जाधव हे आमचे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. माझ्या खात्याबाबतच्या निर्णयाना कुठेही स्थगिती नाही. मात्र, तरी देखील स्वतः भास्कर जाधव यांच्याशी चर्चा करु, त्यांच्या मनात ज्या काही शंका आहेत. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, शेवटी ते विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंचं बंड, उद्धव ठाकरे रणांगणांत; शिवसेनेच्या बांधणीसाठी 20 दिवसांत 13 बैठका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.