ETV Bharat / state

Bhaskar Jadhav On Raj Thackeray : राज ठाकरे अयोध्येत योगींच्या 'टकल्याला' शाई लावणार का?; भास्कर जाधवांचा सवाल - MNS president Raj Thackeray

शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्यावर खोचक टीका ( Shiv sena MLA Bhaskar Jadhav criticized Raj Thackeray ) करत त्यांना काही सवाल केले आहेत. राज ठाकरे यांनी योगी यांचे अभिनंदन केले होते, यावरून भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Bhaskar Jadhav On Raj Thackeray
भास्कर जाधव
author img

By

Published : Apr 30, 2022, 5:13 PM IST

Updated : Apr 30, 2022, 7:43 PM IST

रत्नागिरी - शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांच्यावर खोचक टीका ( Shiv sena MLA Bhaskar Jadhav criticized Raj Thackeray ) करत त्यांना काही सवाल केले आहेत. राज ठाकरे हे परिवर्तनवादी नेते आहेत, पक्ष स्थापनेपासून त्यांनी बदललेला झेंडा, पक्षाची धोरणे, मोदींवरची स्तुतीसुमने आणि त्यानंतर मोदींवर केलेली टीका, लाव रे तो व्हिडीओ आणि आताची स्थिती याचा दाखला देत राज ठाकरे हे परिवर्तनवादी भोंगा असून त्यांच्या भोंग्याकडे कुणीही लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

योगींबाबतच्या त्या विधानावरून राज ठाकरेंना सवाल - तसेच ज्या योगींना राज ठाकरे गंजा, म्हणजेच टकल्या म्हणाले होते ते राज ठाकरे आता अयोध्येत जाऊन त्यांच्या टकल्याला शाई लावणार आहेत का? असा खोचक सवाल भास्कर जाधव ( Raj Thackeray statement About yogi ) यांनी केला आहे, ते आज चिपळूण येथे बोलत होते.

राज ठाकरे यांच्यावर भास्कर जाधवांची सडकून टीका - राज ठाकरे यांच्याकडे सध्या नाईलाजास्तव भाजपचा भोंगा वाजवत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कोणीही लक्ष देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणालेत. एवढ्यावरच न थांबता भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका करत पुढील काळात ते पुन्हा भाजपवर टीका करायला सुरुवात करतील आणि आम्हाला मदत करतील असेही उपरोधाने आमदार जाधव हे म्हणाले.

राज ठाकरे यांनी योगी यांचे केले होते अभिनंदन - आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! अशी टीका करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( UP CM Yogi Adityanath ) यांचे अभिनंदन करत आभार मानले होते.

राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये म्हणाले होते की, 'उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पुर्वक अभिनंदन आणि आभार आमच्याकडे महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'! महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना'.

हेही वाचा - Raj Thackeray's Tweet : महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'- राज ठाकरे

Last Updated : Apr 30, 2022, 7:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.