ETV Bharat / state

पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात जिल्ह्यात शिवसेनेचे आंदोलन - Shiv Sena agitation against petrol diesel price hike in Ratnagiri

पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरची भरमसाट दरवाढ झाली असल्याने मोदी सरकारच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय हे आंदोलन छेडण्यात आले. मुख्य रस्त्यांवर हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

रत्नागिरी शिवसेना आंदोलन न्यूज
रत्नागिरी शिवसेना आंदोलन न्यूज
author img

By

Published : Feb 5, 2021, 6:51 PM IST

रत्नागिरी - पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलिंडरची भरमसाट दरवाढ झाली असल्याने मोदी सरकारच्या विरोधात रत्नागिरीत शिवसेनेने जोरदार आंदोलन केले. प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय हे आंदोलन छेडण्यात आले. जिल्हा परिषद गट मिरजोळे व नाचणे येथील शिवसैनिकांनी शुक्रवारी रत्नागिरी रेल्वे स्थानक फाट्यावर आंदोलन करत निषेध केला. तसेच हातखंबा विभागाच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावरील पाली तिठा येथेही केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

रत्नागिरी शिवसेना आंदोलन न्यूज
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात जिल्ह्यात शिवसेनेचे आंदोलन

हेही वाचा - मुख्यमंत्री महोदय, इकडेही लक्ष द्या; उपोषणकर्त्या शेतकऱ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न

मुख्य रस्त्यांवर शिवसेनेचे आंदोलन

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. रेल्वेस्थानक फाटा येथील मुख्य रस्त्यांवर हे आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांबरोबरच सामान्य नागरिकही सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व उपजिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाबुशेठ म्हाप व नाचणे जिल्हा परिषद गट सदस्य प्रकाश रसाळ यांनी केले होते. या आंदोलनात मिरजोळे, शीळ, खेडशी, कारवांचीवाडी, कुवारबांव, नाचणे, काजरघाटी, परिसरातील शिवसैनिक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, पाली तिठा येथेही मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

पेट्रोल-डिझेलची दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध

यावेळी मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल-डिझेलची दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढ मागे घ्या, अशी घोषणाबजी करण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे निषेध व्यक्त करण्यात आला. दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले आहे. वारंवार सामान्य नागरिकांवर मोदी सरकार दरवाढ करून अतिरिक्त बोजा टाकत असल्याने शिवसेना रस्त्यावर उतरली आहे, अशी प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांनी दिली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसह सर्व गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. पेट्रोल डिझेल व गॅसवरील अन्याय्य दरवाढ केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा - न्यायमूर्ती पुष्पा गनेदीवाला यांना हटवा, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.