ETV Bharat / state

Dussehra 2022 : रत्नागिरी जिल्ह्यातून 70 ते 80 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर, राजन साळवींची माहिती - शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी

Dussehra Gathering 2022: रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास 70 ते 80 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जातील. आणि माझ्या मतदारसंघातून जवळपास 18 ते 20 हजार शिवसैनिक जाणार असल्याचे शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते. तसेच आतापर्यंतचे दसरा मेळावे हे विक्रमी मेळावे झालेले आहेत. कोकण आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं आहे.

MLA Rajan Salvi
MLA Rajan Salvi
author img

By

Published : Oct 4, 2022, 8:10 PM IST

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातून जवळपास 70 ते 80 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जातील. आणि माझ्या मतदारसंघातून जवळपास 18 ते 20 हजार शिवसैनिक जाणार असल्याचे शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते. तसेच आतापर्यंतचे दसरा मेळावे हे विक्रमी मेळावे झालेले आहेत. कोकण आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं आहे. Shiv Sainiks from Ratnagiri district त्यामुळे यावर्षीचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा Dussehra Gathering 2022 हा देखील विक्रमी दसरा मेळावा असेल, असे राजन साळवी MLA Rajan Salvi यांनी म्हटले आहे.

राजन साळवींची माहिती

शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख - मुंबई शहर परिसरात शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख आहेत. या विभाग प्रमुखांना महापालिकेच्या 227 प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. एका प्रभागातून किमान चार बसेस भरून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर येणे अपेक्षित आहे. म्हणजेच मुंबईतून शिवाजी पार्क सुमारे 900 बसेस येणार आहेत. यासाठी सातत्याने गटप्रमुख शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या बैठका होत आहेत.

यंदाचा दसरा मेळावा हा शक्ती प्रदर्शनाचा मेळावा असल्याने त्यासाठी जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहेत. मुंबईतून किमान 50000 शिवसैनिकांनी हजेरी लावणे अपेक्षित असून ठाणे पालघर नवी मुंबई रायगड आणि उर्वरित महाराष्ट्रातून किमान 50 हजार असे एक लाख शिवसैनिकांचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कशी असेल पार्कतील व्यवस्था? - यंदा शिवसेनेच्या वतीने खुर्च्या मांडण्यात येणार असून बाहेरून येणाऱ्या शिवसैनिकांना अल्पोपहार आणि पाणी त्यांच्या खुर्चीवरच मिळणार आहे. यासाठी सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच, बसेसच्या भाड्यापोटी लाखो रुपये खर्च केले जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.