ETV Bharat / state

अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी खासदार - शरद पवार - अनंत गीते

पवार म्हणाले, की गीतेंना तुम्ही ६ वेळा निवडून दिलात. मी गेली अनेक वर्ष संसदेत आहे. मात्र, मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कधीच कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडले नाही. तसेच आता सत्तेची ताकद असतानासुद्धा त्यांनी काही केले नाही, अशी सडकून टीका पवार यांनी यावेळी अनंत गीतेंवर केली.

गुहागर येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार
author img

By

Published : Apr 13, 2019, 11:46 PM IST

Updated : Apr 14, 2019, 6:06 PM IST

रत्नागिरी - अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी सभासद, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ गुहागर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

गुहागर येथे जाहीर सभेत बोलताना शरद पवार

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप आणि आरपीआय (कवाडे गट) महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, शेखर निकम, कुमार शेट्ये यांच्यासह माहाआघाडीचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, की गीतेंना तुम्ही ६ वेळा निवडून दिलात. मी गेली अनेक वर्ष संसदेत आहे. मात्र, मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कधीच कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडले नाही. तसेच आता सत्तेची ताकद असतानासुद्धा त्यांनी काही केले नाही, अशी सडकून टीका पवार यांनी यावेळी अनंत गीतेंवर केली.

पवारांच्या भाषणादरम्यान पावसाची हजेरी

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक पावसाचे आगमन झाले. यावेळी सभेला आलेल्या लोकांची मात्र तारांबळ उडाली. त्यामुळे लोक मैदान सोडून जात होते तर काहीजण हातातील रुमाल, पक्षाचे पट्टे डोक्यावर घेतले. दरम्यान, यावेळी एका महिलेने डोक्यावर खुर्ची घेतली होती.

Intro:अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी खासदार - शरद पवार

रत्नागिरी, प्रतिनिधी

अनंत गीते म्हणजे संसदेतलं मौनी सभासद अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुहागर येथे जाहीर सभेत केली..
रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-आरपीआय(कवाडे गट) माहाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.. यावेळी उमेदवार सुनील तटकरे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, शेखर निकम, कुमार शेट्ये यांच्यासह माहाआघाडीचे पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते उपस्थित होते..
यावेळी पवार बोलताना म्हणाले की गीतेना तुम्ही 6 वेळा निवडून दिलंत.. मी गेली अनेक वर्ष संसदेत आहे, मात्र मी संसदेत अशी एक व्यक्ती पाहिली की खासदार म्हणून त्यांनी कोकणच्या, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर तोंड उघडलं नाही.. तसेच आता सत्तेची ताकद असताना सुद्धा काही केलं नाही अशी सडकून टीका यावेळी पवार यांनी यावेळी अनंत गीतेंवर केली..

पवारांच्या भाषणादरम्यान पावसाची हजेरी

शरद पवार यांचं भाषण सुरू असताना अचानक पावसाचं आगमन झालं.. यावेळी सभेला आलेल्या लोकांची मात्र तारांबळ उडाली... त्यामुळे मैदान सोडून जाऊ लागली.. तर काहीजण हातातील रुमाल, पक्षाचे पट्टे डोक्यावर घेऊ लागले.. एका महिलेने डोक्यावर खुर्ची घेतली

Byte - शरद पवार, अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस Body:अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी खासदार - शरद पवारConclusion:अनंत गीते म्हणजे संसदेतले मौनी खासदार - शरद पवार
Last Updated : Apr 14, 2019, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.