रत्नागिरी - महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत परराज्यातील घुसखोरी करणाऱ्या मच्छीमारी बोटींवर आता कडक कारवाई होणार आहे. गुजरात राज्याच्या धर्तीवर आता महाराष्ट्राच्या हद्दीत घुसणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाईसाठी वेगळा कायदा केला जाणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले असता मंत्री सत्तार प्रसार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, वेगळा कायदा करण्यासाठी मत्स्यविभागाचे मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत येत्या 15 दिवसांत बैठक केली जाईल आणि त्यानंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल.
मत्स्यविभागाला आधुनिक साधन समुग्री दिली जाणार
मत्स्यविभागाला आधुनिक साधनसामग्री दिली जाणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. दर्जेदार मासळीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या दापोली तालुक्यातील हर्णे बंदराची त्यांनी पहाणी केली.
लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन येथील प्रश्न मार्गी लावू
हर्णे बंदरासाठी आमदार योगेश कदम यांनी सुचवलेली जेटी आणि येथील मच्छीमारांच्या सुविधेसाठी सर्व उपाययोजनासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक घेवून येथील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडून निधी वाटपात काटकसर नाही; चव्हाणांचे विधान सत्तारांनी खोडले, महाजनांवरही टीका