रत्नागिरी - शहरात चोऱ्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. सोमवारी पहाटे चोरट्यांनी जुना माळ नाका परिसरातील दोन दुकानांवर डल्ला मारला. युवराज मेडिकल आणि पुष्पांजली इलेक्ट्रिकल्स ही दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेली दुकाने फोडून चोरट्यांनी शहर पोलिसांना एकप्रकारे खुले आव्हान दिले आहे. युवराज मेडिकलमध्ये चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. मात्र, पुष्पांजली इलेक्ट्रीकल्स या दुकानातील सुमारे १ लाखाची रोकड त्यांनी लांबवली आहे.
हेही वाचा - रत्नागिरी: भाजपने अनुकूलता दाखवलेल्या नाणार प्रकल्पाचे भवितव्य धूसर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांध्ये घरफोडीच्या घटना घडत आहेत. या चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहर पोलिसांची दोन पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत.