ETV Bharat / state

कोकणात होतय ब्लॅक राईसवर संशोधन; बदलू शकते शेतकऱ्यांचे अर्थकारण - रत्नागिरी ब्लॅक राईस संशोधन

कोकणात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विविध प्रकारच्या भाताची लावणी येथील शेतकरी करतात. सध्या रत्नागिरीमध्ये ब्लॅक राईसवर संशोधन सुरू आहे. या संशोधनाला यश आल्यास कोकणातील शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

Black Rice
ब्लॅक राईस
author img

By

Published : Feb 4, 2021, 9:44 AM IST

रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या संशोधन केंद्रांमध्ये गेल्या काही वर्षात भाताच्या नवनवीन जातींवर संशोधन करून त्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदाही होत आहे. याच ठिकाणी सध्या ब्लॅक राईसवर संशोधन सुरू आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो.

रत्नागिरीमध्ये ब्लॅक राईसवर संशोधन सुरू आहे
संशोधन कशा प्रकारे -

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्रात सध्या 'ब्लॅक राईस'वर संशोधन सुरू आहे. कोकणातील हवामानात हे बियाणे चांगल्याप्रकारे कसे येऊ शकेल आणि कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी हे संशोधन सुरू आहे. पूर्णतः काळे व जाड असणारे हे बियाणे येथील संशोधन केंद्रात वरच्या बाजूने पांढरे, आतमध्ये काळ्या रंगाचे व बारीक कसे करता येईल यावर संशोधन सुरू आहे. गेल्या वर्षाभरापासून हे संशोधन सुरू आहे. कृषी केंद्राच्या शेतावर भात लावणीपासून ते त्यांचा जेनेटिक व्हेरिएशनमध्ये बदल करण्याचे काम सुरू आहे. हे बियाणे शेतात खूप उंच वाढते. याचा उपयोग करून कोकणात संशोधन केंद्राने पांढऱ्या भातासारखे व बारीक बियाणे तयार करण्यावर भर दिला आहे. या सर्व कामात संशोधन केंद्राचे तज्ज्ञ व कर्मचारी सक्रिय आहेत. संशोधन सुरू असलेल्या या बारीक दाण्याच्या ब्लॅक राईसचे बियाणे शेतकऱ्यांना पुढील एक ते दोन वर्षांत उपलब्ध होईल, अशी माहिती शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी भरत वाघमोडे यांनी दिली.

ब्लॅक राईस
ब्लॅक राईस

ब्लॅक राईसची वैशिष्ट्ये -

हा तांदूळ चविष्ट असून रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आहे. लाल भात बियाणे आणि ब्लॅक राइस दोन्हीमध्ये पोषक आर्यन, फायबर, झिंक असते. मानवाच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्याची जास्त क्षमता ब्लॅक राईसमध्ये आहे. जास्त प्रथिनांमुळे बियांणा रंग प्राप्त होतो.

शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो फायदा -

ब्लॅक राईसचे फायदे अनेक आहेत. त्यामुळे साहजिकच त्याला मोठी मागणी असते. कोकणातील शेतकऱ्यांनी या तांदळाचे उत्पादन घेतल्यास या तांदळाला चांगला दर मिळू शकतो. दीडशे ते दोनशे रुपये किलो असा भाव मिळू शकतो. दुर्लक्षित झालेल्या नाचणीचे फायदे लक्षात आल्यानंतर नाचणीला मागणी सध्या वाढत आहे. तशाचप्रकारे ब्लॅक राईसला देखील भविष्यात चांगली मागणी वाढेल आणि त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, अशी माहिती भरत वाघमोडे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.