ETV Bharat / state

गणपतीपुळ्यात तीन घटनांमध्ये समुद्रात बुडणाऱ्या 12 जणांना वाचवण्यात यश

author img

By

Published : Nov 8, 2019, 7:55 PM IST

Updated : Nov 8, 2019, 11:24 PM IST

गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर बुडणाऱ्या १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. येथे झालेल्या तीन घटनांमध्ये एकूण १२ जण बुडाले होते.

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात यश

रत्नागिरी - गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडणाऱ्या 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक तरुण, जीवरक्षक आणि वॉटर सपोर्टच्या माध्यमातून या पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. बदलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि हिंगोलीतील हे पर्यटक असल्याची माहिती समोर आली आहे.

गणपतीपुळ्यात तीन घटनांमध्ये समुद्रात बुडणाऱ्या 12 जणांना वाचवण्यात यश

हेही वाचा- 'एसपीजी' सुरक्षा काढण्यात येणार, गांधी कुटुंब आता 'झेड प्लस'मध्ये

गणपतीपुळेच्या समुद्रात बुडणाऱ्या 12 पर्यटकांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थ आणि जीवरक्षकांना यश आलं आहे. शुक्रवारी तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये हे 12 जण बुडाल्याची घटना घडली. बुडणाऱ्या पर्यटकांमध्ये रत्नागिरी शहरातील नाचणे, बदलापूर, नाशिक, हिंगोली, औरंगाबाद येथील पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटक बुडण्याची पहिली घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी शहरातील चारजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी गेले होते. यामध्ये मारिया अखिल फकीर (वय १२), सिमरन अखिल फकीर (वय१६), मुबारक शेख (वय२०) आणि रत्नादिप हरिहर शहा (वय२४) सर्व राहणार रत्नागिरी नाचणे या चौघांचा समावेश होता. दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हे चारही तरुण पोहण्यासाठी गणपतीपुळे समुद्रात उतरले होते. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात ओढले गेले. समुद्रात बुडू लागल्याने चौघांनीही आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकून किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी आणि ग्रामस्थांनी या चौघांचे प्राण वाचवले.

दुसऱ्या घटनेत सायंकाळी चार वाजता बदलापूर येथून आलेले पाचजण बुडत असल्याची घटना घडली. यामध्ये प्रणय दत्तात्रय भिसे (वय१८), दिपक तुकाराम हरडकर (वय३०), विनय रवींद्र भिसे (वय२७), भालेश गजानन भिसे (वय२७) आणि विकास गजानन भिसे (वय२४) सर्व राहणार बदलापूर. हे गणपतीपुळेत देवदर्शनासाठी आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हे पाचही जण समुद्रात आंघोळीसाठी उतरले. मात्र, ते खोल पाण्यात बुडू लागले. यांनाही जीवरक्षक आणि स्थानिक विक्रेत्यांनी समुद्रातून बाहेर काढले.

तिसऱ्या घटनेत मनिष सुरेश सोनवणे (वय ३१ रा. औरंगाबाद) महेश अशोक जाधव (वय ३९, नाशिक) आणि विशाल लक्ष्मण शिंदे (वय २१,रा. हिंगोली) या तिघांनाही बुडताना वाचण्यात आले. स्थानिक तरुण व सुलभ शौचालय चालक निखिल सुर्वे, जीवरक्षक आशिष माने, अनिकेत राजवाडकर, ओंकार गवाणकर, मयुरेश देवरुखकर आणि अक्षय माने तसेच वॉटर स्पोर्टचे चालक मोमीन खान, चेतन बोरकर, प्रशांत बोरकर आणि नूर खान या सगळ्यांनी मिळून या बुडणाऱ्या 12 जणांचे प्राण वाचवले.

Intro:रत्नागिरी

- गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात यश त

तीन घटनांमध्ये एकूण 11 जण बुडाले होते

स्थानिक तरुण, जीवरक्षक आणि वॉटर स्पोर्टच्या माध्यमातून वाचवले 11 जणांचे प्राण

बदलापूर, नाशिक , औरंगाबाद आणि हिंगोलीतल्या पर्यटकांच्ये वाचवले प्राणBody:गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात यश Conclusion:गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात यश
Last Updated : Nov 8, 2019, 11:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.