रत्नागिरी - जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीत 23 जणांचा बळी गेला होता. या घटनेत धरणाच्या पायथ्याशी वसलेली भेंदवाडीतील घरे उद्ध्वस्त झाली होती. दुर्घटनेच्या तपासासाठी शासनाने एसआयटीची स्थापना केली होती. या समितीचा अहवाल या आठवड्यात शासनाला दिला जाणार आहे. त्यामुळे दुर्घटनेत नेमका कोणावर ठपका ठेवण्यात आला आहे. की, सर्वांना क्लीन चिट दिली गेली याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा... धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक
तिवरे धरण दुर्घटना
जुलै महिन्यात 2 तारखेला रात्री तिवरे धरण फुटल्यानंतर पायथ्याशी असलेल्या भेंदवाडीतील 23 जणांचा हकनाक बळी गेला होता. तिवरे नदीकाठच्या गावांनाही धरणफुटीचा तडाखा बसला होता. तिवरेसह व नदीकाठच्या परिस्थितीत पूर्वपदावर येण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि समाजातील विविध संस्था कामास जुंपल्या होती. तिवरेवासीयांवर मोठी आपत्ती कोसळल्याने समाजातील विविध घटकांतून मदतीचा ओघ सुरू होता. तिवरे धरणाची बांधणी 20 वर्षापूर्वी झाली होती. अवघ्या 20 वर्षात मातीचे धरण फुटल्याने टीकेचा भडीमार सुरू होता. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून तिवरे धरणास गळती लागली होती. मे महिन्याच्या अखेरीस मातीचा भराव टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली. परिणामी पावसाळ्यात 2 जुलैला धरण फुटले आणि 23 जणांचा बळी गेला.
हेही वाचा... सीएए कायद्यातील तरतुदींवर राहुल गांधींनी केवळ 10 ओळी बोलून दाखवाव्यात, भाजपचे आव्हान
तिवरे धरण फोडणारा 'खेकडा' कोण? लवकरच समजणार
तिवरे धरण हे खेकड्यांनी फोडले असल्याच दावा तत्कालीन जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. तिवरे धरण फुटणे ही एक नैसर्गिक संकट होते. आपण अधिकारी आणि ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरल्याने फुटले, असा दावा तेव्हाचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. मात्र, त्यांच्या त्या दाव्यानंतर सावंत यांच्यावर टीका झाली होती. तर, अनेकांनी यावर संशोधन करत खेकड्यामुळे धरण फुटू शकत नसल्याचे सिद्ध केले. या सर्व पार्श्वभूमीवर विशेष पथकाच्या या अहवालातून धरणफुटीचे नेमके कारण समजणार आहे. तसा अहवाल सरकारला सादर होणार आहे. त्यामुळे हे धरण फोडणारा खेकडा कोण? हे लवकरच समजणार आहे.