ETV Bharat / state

धक्कादायक..! कोरोनाबाधिताचा मृतदेह नातेवाईकांनी जबरददस्तीने नेला उचलून

author img

By

Published : Jul 28, 2020, 9:35 AM IST

Updated : Jul 28, 2020, 2:01 PM IST

रत्नागिरीतील कोविड रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधिताच्या नातेवाईकांनी चक्क त्याचा मृतदेह जबरदस्तीने उचलून नेला.

civil hospital, ratnagiri
जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी

रत्नागिरी - येथील कोविड रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कोरोनाबाधिताच्या नातेवाईकांनी चक्क त्याचा मृतदेह जबरदस्तीने उचलून नेला. इतकेच नव्हे तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विरोध न जुमानता त्यांनी या नातेवाईकांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. ही घटना रविवारी रात्री घडली.

शहरातील राजीवडा येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालय म्हणजेच कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अतिदक्षता विभागात या रुग्णाचा मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी गैरसमजातून अतिदक्षाता विभागात जावून या पॉझिटिव्ह रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पारिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला विरोध केला. मात्र, या 25 ते 30 जणांच्या समूहाने या विरोधाला जुमानले नाही. उलट या कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घातली आणि मृतदेह घेऊन गेले.

पॉझिटिव्ह मृत रुग्णासाठी शासनाने ठरवून दिलेली प्रक्रिया पुर्ण न करताच नातेवाईक मृतदेह तसाच घेऊन गेले. इतकेच नव्हे तर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. दरम्यान 'आम्ही नातेवाईकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्याने या समूहासमोर आम्हाला काहीच करता आले नाही', अशी माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याबाबत पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची, याचा निर्णय जिल्हा प्रशासन आज घेण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेमुळे अधिकारी आणि कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

Last Updated : Jul 28, 2020, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.