ETV Bharat / state

जीव गेला तरी नाणार रिफायनरी होऊ देणार नाही; ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जीव गेला तरी चालेल पण आमच्या जागेत आम्ही ही रिफायनरी होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन या प्रकल्पाचा दगड जमिनीत पुरुन दाखवावा, असे आव्हान यावेळी देण्यात आले. मोठ्या संख्येने रिफायनरी विरोधातील लोक यावेळी उपस्थित होती.

ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध
author img

By

Published : Sep 18, 2019, 7:49 PM IST

रत्नागिरी- अधिसूचना रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अनुकूलता दाखवली आहे. या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे रिफायनरी विरोधकांकडून राजापूरमधल्या दत्तवाडी इथे मुख्यमंत्र्यांचा बुधवारी सायंकाळी जोरदार निषेध करण्यात आला.

ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध

हेही वाचा-रत्नागिरीत मासेमारी नौका समुद्रात बुडाली; तीन मच्छिमारांना वाचवण्यात यश

जीव गेला तरी चालेल पण आमच्या जागेत आम्ही ही रिफायनरी होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन या प्रकल्पाचा दगड जमिनीत पुरुन दाखवावा, असे आव्हान यावेळी देण्यात आले. मोठ्या संख्येने रिफायनरी विरोधातील लोक यावेळी उपस्थित होती. बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प लोकसभा निवडणुकीवेळी नाणार परिसरातून रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गेले काही महिने वातावरण शांत होते. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये रिफायनरी समर्थक आक्रमक झाले होते. रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरीत भव्य मोर्चाही काढण्यात आला होता.

हेही वाचा-रत्नागिरीत विहिरीत बुडून २ जणांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात महाजनादेश यात्रा घेऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी बाबत सकारात्मक वक्तव्य करत "इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटतय", असे विधान केले. त्यामुळे रिफायनरी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून याबाबत मुख्यमंत्र्यांचा निषेधही करण्यात येत आहे. बुधवारी संध्याकाळी दत्तवाडी येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुन्हा एकदा ग्रामस्थांचा रिफायनरी विरोधातील रोष दिसून आला. स्थानिक जनता व समस्त कोकणवासीयांच्या भावनांचा मुख्यमंत्र्यांनी सपशेल अनादर केला. दोन वर्षे सातत्याने केलेल्या संघर्षाला त्यांनी काही तुटपुंज्या लोकांच्या बॅनर बाजीसमोर कमी लेखले. हा आम्हा कोकणी जनतेचा अपमान असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या रिफायनरी संदर्भातील वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून, रिफायनरी नाणार परिसरातच काय कोकणात कुठेच येऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणांमुळे परिसरातील वातावरण दुमदुमून गेले होते.

Intro:रिफायनरी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध

जीव गेला तरी रिफायनरी होऊ देणार नाही

ग्रामस्थांचा इशारा

रत्नागिरी, प्रतिनिधी

अधिसूचना रद्द झालेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा अनुकूलता दाखवत, या प्रकल्पाबाबत फेरविचार करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रिफायनरी विरोधकांकडून राजापूरमधल्या दत्तवाडी इथं मुख्यमंत्र्यांचा बुधवारी सायंकाळी जोरदार निषेध करण्यात आला. जीव गेला तरी चालेल पण आमच्या जागेत आम्ही ही रिफायनरी होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन या प्रकल्पाचा दगड जमिनीत पुरून दाखवावा असं आव्हान यावेळी देण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने रिफायनरी विरोधातील लोकं यावेळी उपस्थित होती.
बहुचर्चित रिफायनरी प्रकल्प लोकसभा निवडणुकीवेळी नाणार परिसरातून रद्द करण्यात आला होता. त्यामुळे गेले महिने वातावरण शांत होतं. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये रिफायनरी समर्थक आक्रमक झाले होते. रिफायनरीच्या समर्थनार्थ रत्नागिरीत भव्य मोर्चाही काढण्यात आला. होता. दरम्यान मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात महाजनादेश यात्रा घेऊन आलेल्या मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी बाबत सकारात्मक वक्तव्य करत 'इथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असं मला वाटतंय, असं विधान केलं. त्यामुळे रिफायनरी विरोधक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून याबाबत मुख्यमंत्र्यांचा निषेधही करण्यात येत आहे.
बुधवारी संध्याकाळी दत्तवाडी येथे ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुन्हा एकदा ग्रामस्थांचा रिफायनरी विरोधातील रोष दिसून आला.. स्थानिक जनता व समस्त कोकणवासीयांच्या भावनांचा मुख्यमंत्र्यांनी सपशेल अनादर केला. दोन वर्षे सातत्याने केलेल्या संघर्षाला त्यांनी काही तुटपुंज्या लोकांच्या बॅनर बाजीसमोर कमी लेखले. हा आम्हा कोकणी जनतेचा अपमान आहे असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांच्या रिफायनरी संदर्भातील वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत असून रिफायनरी नाणार परिसरातच काय कोकणात कुठेच येऊ देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होती. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील घोषणांमुळे परिसरातील वातावरण दुमदुमून गेलं होतं.

Byte --Body:रिफायनरी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध

जीव गेला तरी रिफायनरी होऊ देणार नाही

ग्रामस्थांचा इशारा
Conclusion:रिफायनरी विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध

जीव गेला तरी रिफायनरी होऊ देणार नाही

ग्रामस्थांचा इशारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.