रत्नागिरी - कोल्हापूर येथे झालेल्या मॉडर्न पेंटॅथलॉन विभागीय शालेय स्पर्धेत रत्नागिरी मधील तनया मिलके आणि मधुरा शेलार या दोघींची राज्य स्तरासाठी निवड झाली आहे.
हेही वाचा - 'मैदान कुठलेही असो, षटकार मारणार'
विभागीय शालेय मॉडर्न पेंटॅथलॉन स्पर्धा कोल्हापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधदुर्ग या जिल्ह्यातून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू आले होते. रत्नागिरीतील सावर्डे येथे प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 17 वर्षाखालील 4 मुले आणि 4 मुलींची निवड झाली. त्यामधील १२०० मीटर धावणे, 200 मीटर पोहणे या गटात रत्नागिरीतील तनया मिलके आणि मधुरा शेलार यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.
कोल्हापूर येथील सागर पाटील जलतरण तलावावर पोहण्याची स्पर्धा झाली. सरोज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मॉडर्न पेंटॅथलॉनचे सचिव अजय पाठक, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे संदीप जाधव, सुभाषचंद्र न पवार, आनंद चरापले उपस्थित होते. नीळकंठ आखाडे, प्रभाकर डांगे, अंकुश पाटील, अमर पाटील, भक्ती पाटील व महेश शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले .
रत्नागिरीतीतून प्रथमच अशा स्पर्धेसाठी मुले पाठवण्यात आली होती. त्यातील दोघींची निवड राज्यस्तरावर झाल्याबद्दल मॉडर्न पेंटॅथलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पाटणकर, डॉ. निलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, अन्य पदाधिकाऱ्यांसह या संघटनेच्या सचिव आणि पेंटॅथलॉनमधील बॅथले च्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विजेत्या डॉ निशिगंधा पोंक्षे यांनी अभिनंदन केले आहे.