ETV Bharat / state

शिवसेनेची सत्ता असलेल्या विलये ग्रामपंचायतीचाही रिफायनरी समर्थनाचा ठराव पारित - vilye village

शिवसेनेची सत्ता असलेल्या राजापूर तालुक्यातील विलये ग्रामपंचायतीनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव पारित केला आहे. विशेष म्हणजे विलये गावातील 2700 एकर जमीन मालकांची या प्रकल्पासाठी संमती पत्रं आहेत. या प्रकल्पाला जिथे जमिन मालक जमीन द्यायला तयार आहेत तेथे हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंजूर करावा, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना एक लेखी निवेदन देण्यात आलं आहे.

ratnagiri vilye village gram panchayat support to refinery project
रिफायनरीला वाढतं समर्थन शिवसेनेची सत्ता असलेल्या विल्ये ग्रामपंचायतीचाही रिफायनरी समर्थनाचा ठराव पारित मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन
author img

By

Published : Jul 15, 2021, 2:41 AM IST

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. रिफायनरी समर्थन संघटना स्थापन झालेल्या आहेत. काही ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प समर्थनाचे ठरावही पारित केलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेची सत्ता असलेल्या राजापूर तालुक्यातील विलये ग्रामपंचायतीनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव पारित केला आहे. विशेष म्हणजे विलये गावातील 2700 एकर जमीन मालकांची या प्रकल्पासाठी संमती पत्रं आहेत. या प्रकल्पाला जिथे जमिन मालक जमीन द्यायला तयार आहेत तेथे हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मंजूर करावा, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना एक लेखी निवेदन देण्यात आलं आहे. या ठरावाच्या प्रतिसह एक लेखी निवेदन विलये ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राजापूर तहसीलदारांना देण्यात आले.

समर्थनात वाढ
रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पाला समर्थन वाढत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. दरम्यान यापूर्वी राजापूर नगर परिषदेसह तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प समर्थनाचे ठराव पारित केले आहेत. त्यात आता विलये ग्रामपंचायतीनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव पारित केला आहे. ग्रामपंचायतीमध्ये शशिकांत तुकाराम गुरव यांनी हा ठराव मांडला त्याला राजकुमार परवडी यांनी अनुमोदन दिले व सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे.

निवेदनात काय ?
स्थानिकांना रोजगार, स्थानिक गावांचा सर्वांगिण विकास, वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा व पर्यावरण स्नेही प्रकल्पासाठी आम्ही हे समर्थन जाहीर करत आहोत, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. विलये ते सागवे परिसरामध्ये असलेली सुमारे आठ हजार एकर जमीनीच्या मालकांनी संमती दिली असून त्यामध्ये विलये गावाची सुमारे २७०० एकरची संमती पत्रे आहेत. या परिसरातील जागा आणि समर्थनाचा विचार करून विलये ते सागवे परिसरामध्ये रिफायनरी व पेट्रो केमीकल प्रकल्पाचे पुनर्जिवन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होण्यासाठी राजापूर नगर परिषदेसह पाचल, नाटे घाउलवल्ली या ग्रामपंचयातींनी यापूर्वी ठराव केलेला आहे. पक्षीय मतभेद विसरुन सर्वांनी केलेले स्वागत ही बाब महत्वाची आहे. याला शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीसह सर्व पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिलेला आहे, असेही निवेदनात म्हटलं आहे.

कोकण म्हणजे प्रकल्पाला विरोध ही अयोग्य प्रतिमा पुसून टाकण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पामधील आमची ग्रामपंचायत विलयेने समर्थनार्थ ठराव करुन एक धाडसी पाऊल व भुमिका आहे असे नमुद केले आहे. त्याचे शासन व सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मनापासून स्वागत करुन अन्य ग्रामपंचायतींना विकासासाठी रोजगारीसाठी असेच प्रोत्साहन देतील व कोकणातील तरुण वर्ग, सर्वसामान्य जनता व लोकांना पक्षीय हेवे दावे विसरून मार्गदर्शकाची भूमिका घेतील याची आम्हाला आशा व खात्री आहे. तरी विकासासाठी मुख्यमंत्री, खासदार यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रकल्प या परिसरात राबविण्याबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे मुंबईचे माजी नगरसेवक सुहास तावडे, प्रल्हाद तावडे, संतोष शिवराम तावडे, पिंटया तावडे, निलेश पाटणकर, पंढरीनाथ आंबेरकर आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.