ETV Bharat / state

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब होताच रत्नागिरीतही जल्लोष

मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर रत्नागिरीतही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून ह्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

निर्णयाचे स्वागत
author img

By

Published : Jun 27, 2019, 9:53 PM IST

रत्नागिरी - मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने अखेर गुरूवारी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. रत्नागिरीतही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून, पेढे वाटून हा जल्लोष करण्यात आला.

मराठा आरक्षणावरील निर्णयाचे रत्नागिरीत स्वागत

मराठा आरक्षणासाठी गेली 25 वर्ष मराठा समाज लढा देत होता. आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. या लढ्यात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले. या अरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर आज या लढ्याला यश आले. 16 टक्के आरक्षण देणं शक्य नसल्याचे म्हणत न्यायालयाने मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देणं शक्य असल्याचे मत नोंदवले आहे. मराठा समाजाला यापुढे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध असणार आहे. त्यामुळेच मराठा समाजाकडून राज्यभर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे.

रत्नागिरीतल्या मारुती मंदिर परिसरातही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत, घोषणा देत, फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला.

Intro:मराठा आरक्षण, रत्नागिरीतही जल्लोष

रत्नागिरी, प्रतिनिधी

मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयाने अखेर आज शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे मराठा समाजात आनंदाचं वातावरण असून राज्यभर जल्लोष करण्यात येत आहे. रत्नागिरीतही मराठा समाजाकडून आज जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून पेढे वाटून हा जल्लोष करण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी गेली 25 वर्ष मराठा समाज लढा देत होता. आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले.. या लढ्यात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले. या अरक्षणासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती. अखेर आज या लढ्याला यश आलं. 16 टक्के आरक्षण देणं शक्य नसल्याचं न्यायालयाने म्हणत मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देणं शक्य असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यामुळे यापुढे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध असणार आहे. त्यामुळेच मराठा समाजाकडून राज्यभर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे. रत्नागिरीतल्या मारुती मंदिर परिसरातही मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरवत, घोषणा देत, फटाके फोडून हा आनंद व्यक्त करण्यात आला..Body:मराठा आरक्षण, रत्नागिरीतही जल्लोषConclusion:मराठा आरक्षण, रत्नागिरीतही जल्लोष
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.