रत्नागिरी - ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘सी’च्या रत्नागिरी शाखेमार्फत टपाल खात्याच्या विभागीय अधीक्षक कार्यालयाबाहेर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आंदोलन करण्यात आले. 11 सप्टेंबरला मुंबईत राज्यस्तरिय आणि 4 ऑक्टोबरला नवी दिल्लीत राष्ट्रीय आंदोलन करण्यात येणार आहे.
ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन वर्ग-3 च्या मागण्या;
- सी.एस.आय., आर.आय.सी.टी., आय.पी.पी.बी., सी.बी.एस, पोस्टमन डिलीव्हरी या समस्यांचे त्वरित निवारण करावे
- कमलेश चंदा समितीच्या सकारात्मक शिफारशी ग्रामीण डाकसेवकांना लागू कराव्यात आणि सर्व रिक्त जागा त्वरित भराण्यात याव्यात
- 2015 च्या ग्रामीण डाकसेवक सभासद पडताळणीचा निकाल जाहीर करावा
- टपाल खात्यातील खासगीकरण व कंत्राटीकरण थांबवावे
- एम.ए.सी.पी. प्रमोशनचा बेंचमार्क रद्द करा
पोस्टल व आर.एम.एस.लाही पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, खात्याच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण करावे, कामगार प्रतिनिधींचे शोषण थांबवावे आणि उद्दिष्टपूर्तीची सक्ती थांबवण्यात यावी. अशा मागण्या फेडरेशनकडून करण्यात आल्या आहेत.
एन.एफ.पी.ई. फेडरेशन प्रणित ऑल इंडिया पोस्टल एम्प्लाईज युनियन वर्ग 3, पोस्टमन एम.टी.एस. व ग्रामीण डाकसेवक संघटनेने या धरणे आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सध्या विभागीय स्तरावर असलेल्या आंदोलनाची योग्य ती दखल घेऊन प्रशासनाने सकारात्मक उपाययोजना न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा एनएफपीएई फेडरेशन समन्वय समितीचे सचिव सुनील यादव यांनी दिला आहे. वर्ग 3 संघटनेचे विभागीय सचिव सुनील यादव, अध्यक्ष संतोष गोडबोले, पोस्टमन संघटनेचे सचिव दीपक भितळे, ग्रामीण डाकसेवक संघटनेचे सचिव सुरेश गुरव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.