रत्नागिरी - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रत्नागिरीत दाखल झाली. यावेळी राजापूर येथील ओणी गावात लोकांसोबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
रिफायनरी विरोध नाही पण प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध - ठाकरे
जनेतला प्रकल्प नको असेल तर आम्ही जनतेसोबत आहोत. शिवसेनेचा नाणार रिफायनरीला विरोध नाही मात्र प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा... 'उदयनराजे दिवस-रात्र काय करतात जनतेला ठाऊक, मतदाराच त्यांना दाखवतील'
झाडे कापून विकास होणार नाही - आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी आरेतील झाडे कापून विकास होणार नाही, त्यामुळे आमचा आरे प्रकल्पाला विरोध असल्याचे ते यावेळी म्हणाले.
राम मंदिराचा मुद्दाही लवकरच निकाली - ठाकरे
लोकसभेवेळी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला असून त्यानंतरच केंद्रात राम मंदिर बाबत सकारात्मक पाऊले पडायला सुरूवात झाली असल्याचे आदिेत्य यावेळी म्हणाले. तसेच राम मंदिराचा मुद्दाही लवकरच निकाली निघेल असे ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा... महाजनादेश यात्रेत 'एकच वादा अजित दादा'चा जयघोष, पोलिसांचा लाठिचार्ज
नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आशिर्वाद हवाय - आदित्य ठाकरे
लोकांची गर्दी हाच जन आशीर्वाद असून, मी आता काही मते मागायला आलेलो नाही, असे आदित्य यावेळी म्हणाले. लोकसभा निवडणुकीत जी साथ दिलीत त्याबद्दल जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो, असे ते यावेळी म्हणाले.