ETV Bharat / state

रत्नागिरी नगरपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'त्या' चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी काम केल्याने राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेला मदत केल्याचा ठपका या नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.

Four NCP corporators expelled from the party
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी
author img

By

Published : Jan 15, 2020, 5:00 PM IST

रत्नागिरी - विधानसभेसह नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी, रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुदेश मयेकरांनी केली घोषणा

हेही वाचा... रत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या 'त्या' चार नगरसेवकांवर होणार कारवाई?

रत्नागिरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. या पाच नगरसेवकांपैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा येथील सोहेल साखरकर यांना लेखी स्वरूपात राजीनामा देण्याचे आदेश गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले होते. सोमवारी सायंकाळी हे आदेश चारही नगरसेवकांपर्यंत पोहचवण्यात आले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली.

बुधवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुदेश मयेकर यांनी मुसा काझी, सोहेल साखरकर, उज्वला शेट्ये, कौसल्या शेट्ये यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, शहराध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काही नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. तर काही नगरसेवक उघड उघड शिवसेनेचा प्रचार करत होते, असे सागंण्यात आले आहे.

हेही वाचा... रत्नागिरी जि.प. निवडणूक: सभापतीपदी शिवसेनेचे चारही उमेदवार बिनविरोध

जिल्हाध्यक्षांना माझी कारवाई चुकीची वाटत असेल तर त्यांनी थेट माझ्यावर कारवाई करावी. मात्र, असे दगाबाज नगरसेवक पक्षात नको, असा थेट हल्ला मयेकर यांनी यावेळी चढवला. पक्षविरोधी काम करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांकडूनच अशी मागणी होत होती. पक्ष विरोधात काम करणाऱ्या नगरसेवकांना ठेवू नका, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सुदेश मयेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान या चार नगरसेवकांच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले जाणार असून चारही नगरसेवकांचा यापुढे पक्षाशी काहीही संबंध नसेल, असे पत्र देणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

हेही वाचा... मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामात प्रगती न दिसल्यास ठेकेदारावर कारवाई - उदय सामंत

Intro:रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी काम करत शिवसेनेला मदत केल्याचा ठपका

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची घोषणा

रत्नागिरी, प्रतिनिधी

विधानसभेसह नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवार विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा रत्नागिरी तालुका अध्यक्ष सुदेश मयेकर यांनी केली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. या पाच नगरसेवकांपैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा येथील सोहेल साखरकर यांना लेखी स्वरूपात राजीनामा देण्याचे आदेश गटनेते सुदेश मयेकर यांनी दिले होते. सोमवारी सायंकाळी हे आदेश चारही नगरसेवकांपर्यंत पोहचवण्यात आले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली होती.
बुधवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुदेश मयेकर यांनी मुसा काझी,सुहेल साखरकर, उज्वला शेट्ये, कौसल्या शेट्ये यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, शहराध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते.
गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकी दरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेचे उमेदवार उदय सामंत यांना मदत केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. काही नगरसेवक उघडउघड सेनेबरोबर फिरत होते. असा ठपका या चार नगरसेवकांवर ठेवण्यात आला आहे.
या कारवाईला जिल्हाध्यक्षांचा विरोध आहे का असे विचारले असता ते पुढे म्हणाले की जिल्हाध्यक्षांना माझी कारवाई चुकीची वाटत असेल तर त्यांनी थेट माझ्यावर कारवाई करावी मात्र असे दगाबाज नगरसेवक पक्षात नको असा थेट हल्ला मयेकर यांनी चढवला.
पक्षविरोधी काम करणाऱ्या नगरसेवकांनी विरोधात कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण झाली होती आणि कार्यकर्त्यांकडून अशी मागणी होती. पक्ष विरोधात काम करणाऱ्या नगरसेवकांना ठेवू नका अशी मागणी कार्यकर्ते लावून धरली होती, असे सांगत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन गद्दारांना पक्षात स्थान नको यासाठी त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सुदेश मयेकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जर तुम्ही पक्षविरोधी काम केलं नसेल तर मुसा काजी व सोहेल साखरकर दोन नगरसेवकांनी कुराणावर हात ठेवून शपथ घ्या जर त्यांनी तशी शपथ घेतली तर त्यांच्यावरील कारवाई मागे घेऊ. माती खायची होती ती माती खाल्ली असा आरोप देखील मयेकर यांनी यावेळी केला.
दरम्यान या चार नगरसेवकांना बाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले जाणार असून या चारही नगरसेवकांचा यापुढे पक्षाशी काही संबंध नसेल असे पत्र देणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले.

Byte - सुदेश मयेकर, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Body:रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी काम करत शिवसेनेला मदत केल्याचा ठपका

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची घोषणा
Conclusion:रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी काम करत शिवसेनेला मदत केल्याचा ठपका

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांची घोषणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.