ETV Bharat / state

'रत्नागिरी रिफायनरीबाबत लोकहिताचा विचार करून मुख्यमंत्री निर्णय घेतील'

author img

By

Published : Aug 15, 2021, 1:53 PM IST

गणेशोत्सवाला अजून वेळ असल्याने मिरवणुका आणि विसर्जना संदर्भातील अजून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, कोरोनाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे. नियम पाळून उत्सव साजरा करण्यास कोणतीही बंदी नाही.

anil parab
अनिल परब

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आणि संबधितांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी सष्ट केले. ते आज (शनिवारी) रत्नागिरीत बोलत होते.

रिफायनरी प्रकल्प आणि गणेशोत्सवाबाबत बोलताना पालकमंत्री अनिल परब

भाजपचे नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत घेतली होती. यात त्यांनी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेनेचे अन्य नेते यांना रत्नागिरी रिफायरी प्रकल्प हवा आहे, फक्त खासदार विनायक राऊत यांचं प्रबोधन होणे बाकी आहे, असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना पालकमंत्री म्हणाले की, अजूनही कोणी कोणता रेड, ग्रीन किंवा पिवळा सिग्नल दिला आहे, याची मला माहिती नाही. मात्र, याबाबतीत निर्णय घेण्याचे सर्वाधिक मुख्यमंत्र्यांना आहेत. ते लोकांच्या हिताचा विचार करून याबाबत निर्णय घेतील, असे पालकमंत्री यांनी यावेळी स्पष्ट केले.

गणेशोत्सवासंदर्भात अजून कुठल्याच सूचना नाही -

यावर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, गणेशोत्सवाला अजून वेळ असल्याने मिरवणुका आणि विसर्जना संदर्भातील अजून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, कोरोनाचे निर्बंध पाळून गणेशोत्सव साजरा व्हायला पाहिजे. नियम पाळून उत्सव साजरा करण्यास कोणतीही बंदी नाही. फक्त गर्दी करू नये, हा त्या मागचा उद्देश आहे. सध्या आम्ही दररोज या संकटाचे निरीक्षण करत आहोत, कशा पद्धतीने कोरोनाचा प्रवास सुरू आहे. त्यावेळेला जर वाटलं निर्बंध अजून शिथिल करण्याची गरज आहे तर त्यावेळी निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - नितीन गडकरींच्या आरोपात तथ्य आहे की नाही तपासावे लागेल-अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.