ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्हा बँक पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 5 टक्के दराने कर्ज देणार - मंत्री उदय सामंत - loans to flood affected traders

पुरामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील इतर भागातील व्यापाऱ्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या व्यापाऱ्यांकडून आता सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. पण, आता या व्यापाऱ्यांना 50 हजार ते 50 लाखापर्यंत 5 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जाईल. शिवाय, वर्षभर हे कर्ज फेडले नाही तरी चालेल, अशी तयारी जिल्हा बँकेने दर्शवली आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी
author img

By

Published : Jul 28, 2021, 3:17 PM IST

रत्नागिरी - पुरामुळे चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील इतर भागातील व्यापाऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या व्यापाऱ्यांकडून आता सरकारकडून मदतीची अपेक्षा केली जात आहे. पण, आता या व्यापाऱ्यांना 50 हजार ते 50 लाखापर्यंत 5 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केला जाईल. शिवाय, वर्षभर हे कर्ज फेडले नाही तरी चालेल, अशी तयारी जिल्हा बँकेने दर्शवली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याकरता आता चिपळूण, खेड याठिकाणी गरजेप्रमाणे कर्जमंजुरी कक्ष देखील उभारले जाणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा बँक पूरग्रस्त व्यापाऱ्यांना 5 टक्के दराने कर्ज देणार

पुराने मोठे नुकसान
राजापूर, चिपळूण, खेड आणि अन्य ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसातील अतिवृष्टीमध्ये अनेक व्यापारी, दुकानदार, छोटेमोठे उद्योजक, शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिपळूण शहरामध्ये तर व्यापाऱ्यांना पुराने धुवून नेले आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना शुन्यातून उभे करण्याकरता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी ही अल्पदरात कर्ज पुरवठा करणार असल्याची घोषणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केली. दरम्यान 5 टक्के व्याजदराने बँक हा कर्जपुरवठा करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

हेही वाचा - झारखंड सरकार पाडण्याचा डाव; भाजप नेत्यांच्या मागे लागणार चौकशीचा ससेमिरा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.