ETV Bharat / state

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रत्नागिरीत कोण मारणार बाजी?

दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : रत्नागिरीत कोण मारणार बाजी?
author img

By

Published : Oct 23, 2019, 12:25 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात सकाळपासून मोठ्या उत्साहत मतदानाला सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या 5 विधानसभा मतदारसंघात एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दापोली मतदासंघात सर्वाधिक 11 तर चिपळूण मतदारसंघात कमी 3 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गुहागर मतदारसंघात 5, रत्नागिरी - 6 तर राजापूर मतदारसंघात 7 उमेदवार रिंगणात आहेत.

गुहागर विधानसभा मतदारसंघ -

मागील विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांनी 72 हजार 525 एवढी मते घेत विजय मिळवला. गुहागर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे विनय नातू होते. त्यांना 39 हजार 761 मते मिळाली. मात्र, यंदाच्या निवडणूकीसाठी भास्कर जाधव यांनी आपला पक्ष बदलला आहे. जाधव यंदा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असून त्यांना राष्ट्रवादीच्या सहदेव बेटकर यांचे आव्हान असणार आहे.

दापोली विधानसभा मतदारसंघ -

दापोली विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कदम यांनी 52 हजार 907 एवढी मते घेत विजय मिळवला. दापोली विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे सूर्यकांत दळवी होते. त्यांना 49 हजार 123 मते मिळाली. यंदा योगेश कदम शिवसेनेकडून तर, संजय कदम परत एकदा राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले आहेत.

चिपळूण विधानसभा मतदारसंघ -

मागील विधानसभा निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनी 75 हजार 695 एवढी मते घेत विजय मिळवला. चिपळूण विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम होते. त्यांना 69 हजार 627 मते मिळाली. आणि त्यांचा 6 हजार 068 मतांनी पराभव झाला. चिपळूण विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर भाजपचे माधव गवळी, चौथ्या स्थानावर काँग्रेसच्या रश्मी कदम आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोपीनाथ झापळे होते. सदानंद चव्हाण परत एकदा शिवसेनेकडून तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेखर निकम यंदाच्या निवडणूकीसाठी परत एकदा मैदानात उतरले आहेत.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ -

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कारण, शिवसेनाचे उदय सामंत हे इथे प्रबळ आहेत. 2014 मध्ये त्यांनी भाजपचे बाळासाहेब माने यांच्यावर सरशी साधली होती. यंदाच्या निवडणूकीतही सेनेकडून उदय सामंत रिंगणात आहेत. तर, त्यांच्यासमोर काँग्रेसच्या अविनाश लाड यांचे कडवे आव्हान असणार आहे.

राजापूर विधानसभा मतदारसंघ -

2014 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांनी 76 हजार 266 एवढी मते घेत विजय मिळवला होता. राजापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राजेंद्र देसाई होते. त्यांना 37 हजार 204 मते मिळाली. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून अविनाश लाड राजन साळवींच्या विरोधात उतरले आहेत.

Intro:Body:

2014 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या राजन साळवी यांनी 76 हजार 266 एवढी मते घेत विजय मिळवला होता. राजापूर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे राजेंद्र देसाई होते. त्यांना 37 हजार 204 मते मिळाली. यंदाच्या निवडणूकीत काँग्रेसकडून अविनाश लाड राजन साळवींच्या विरोधात उतरले आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.