रत्नागिरी - जिल्ह्यातील पावसाचा जोर अखेर ओसरला असून गेल्या 24 तासात 28.11 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वस्थितीत येत आहे. सर्वच तालुक्यांमध्ये 40 मिमी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. मात्र काही भागात मोठे नुकसान झाल्याने नागरिक सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत.
मागील आठवडाभर जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपले होते. नद्यांना आलेल्या पुरामुळे चिपळूण आणि राजापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण शहराला तर ३ दिवस पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान गुरुवारपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वस्थितीत येत आहे.
वेगवगळ्या भागातील पावसाची नोंद -
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 5 तालुक्यांमध्ये 30 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. खेड आणि राजापूर तालुक्यांमध्ये 38 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर दापोली आणि गुहागरमध्ये 34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वरमध्ये 31 मिमी आणि मंडणगडमध्ये 28 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यांमध्ये 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे..