रत्नागिरी - जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. बुधवारी दुपारी सुरू झालेला पाऊस आजही मुसळधार बरसत आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात १०११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर सरासरी 122 मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू होता. गेल्या २४ तासात सर्वात जास्त पाऊस दापोली तालुक्यात पडला आहे. दापोलीत २१० मिलीमीटर पाऊस पडला आहे.
त्याखालोखाल मंडणगडमध्ये १२७ मिलीमीटर, खेडमध्ये १२४ मिलीमीटर, चिपळूणमध्ये १०५ तर रत्नागिरीत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांमध्ये 80 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. जिल्ह्यात होत असलेल्या आणि त्यात सलग पडणाऱ्या या पावसामुळे बळीराजा सुखावला असून आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.