ETV Bharat / state

गणेश चतुर्थीला गर्दी टाळण्यासाठी लवकरच मूर्तींचे पॅकिंग, सोशल डिस्टन्सचे पालन - ganesh fest 2020

कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं नातं आहे. दरवर्षी गणेशमूर्तीचं आगमन आणि विसर्जन अगदी वाजत-गाजत केलं जातं. मात्र, यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यासाठी सर्वत्र आवाहन होत आहे. तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगला देखील महत्त्व आले आहे.

ganesh festival in ratnagiri
गणेश चतुर्थीला गर्दी टाळण्यासाठी लवकरच मूर्तींचे पॅकिंग, सोशल डिस्टन्से पालन
author img

By

Published : Aug 18, 2020, 1:00 PM IST

रत्नागिरी - कोकणी माणूस आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं नातं आहे. दरवर्षी गणेशमूर्तीचं आगमन आणि विसर्जन अगदी वाजत-गाजत केलं जातं. मात्र, यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सव देखील साधेपणाने साजरा करण्यासाठी सर्वत्र आवाहन होत आहे. तसेच सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगला देखील महत्त्व आले आहे.

गणेश चतुर्थीला गर्दी टाळण्यासाठी लवकरच मूर्तींचे पॅकिंग, सोशल डिस्टन्सचे पालन

त्यामुळे गणेशमूर्ती पाच ते सहा दिवस आधीच घरी नेण्यास सुरुवात झाली आहे. एकाच वेळी गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी होऊ नये, म्हणून मूर्ती कारखानदार ही खबरदारी घेत आहेत. गणेशभक्तही याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

ganesh festival 2020

देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेला कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी दरवर्षी या सणाला आपल्या गावी अगदी हमखास येतो. पण यावर्षी काहीशी परिस्थिती वेगळी आहे. सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबाबतही सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे. याबाबत गणेशमूर्ती कारखानदरही खबरदारी घेत आहेत. अनेक भाविक गणेशमूर्ती आगमनाच्या किंवा प्रतिष्ठापनेच्या दिवशी आणतात. मात्र, यंदा भाविक या मूर्ती ३-४ दिवस आधीच आणत आहेत. गर्दी टाळण्यासाठी कारखानदारांनी देखील मूर्तीची डिलिव्हरीबाबत काही नियमावली बनवल्या आहेत. यासाठी काही दिवस अगोदर टप्प्याटप्प्याने भाविकांना मूर्ती नेण्यास बोलावण्यात येत आहे.

दरोराज एकेका गणेशमूर्ती शाळेतून 25 ते 50 गणपतीच्या मूर्ती भाविक आपल्या घरी नेताना पाहायला मिळत आहे. पण गर्दी न करता, सर्व नियम पाळून बाप्पाच्या जयघोषात या मूर्ती नेल्या जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.