ETV Bharat / state

कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर रत्नागिरी दौरा बातमी

राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून केवळ भावनिक वातावरणात लोकांना दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र, ज्या उपाययोजना गतीनं करण्याची आवश्यकता होती, त्या सरकार करू न शकल्याने आज महाराष्ट्रात कोरोनाने भयावह स्वरूप प्राप्त केलं असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या लढाईत राज्य सरकार पूर्णपणे अपयशी

author img

By

Published : May 20, 2020, 5:08 PM IST

रत्नागिरी - राज्य सरकार कोरोनाच्या लढाईत पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. ते आज (बुधवार) रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

कोरोना साथीच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील भाजपचे आमदार दौऱ्यावर आले आहेत. आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून केवळ भावनिक वातावरणात लोकांना दिलासा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र, लोकांना कळलं आहे की परिस्थिती आता नियंत्रणाबाहेर चालली आहे. ज्या उपाययोजना गतीनं करण्याची आवश्यकता होती, त्या सरकार करू न शकल्याने आज महाराष्ट्रात कोरोनाने भयावह स्वरूप प्राप्त केलं असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

चाकरमान्यांच्या मुद्यावरून दरेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. कोकणातल्या ज्या भूमिपुत्रांच्या जोरावर शिवसेना मुंबईत मोठी झाली, त्यांच्याकडेच शिवसेनेने दुर्लक्ष केले. मोफत किंवा पैसे देऊन एसटी देण्याबाबतदेखील सरकारकडून काहीही प्रयत्न झाले नसल्याची टीका यावेळी दरेकर यांनी केली. तसेच, आज गाव आणि मुंबई इथल्या लोाकांमध्ये असलेल्या विसंवादाला सरकार जबाबदार असल्याचेही दरेकर यांनी म्हटले आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाकी हतबल झालेल्या मानसिक स्थितीत आहेत. ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण सरकारच्या अपयशाबद्दल बोलतात, त्यावरून सरकारमधला विसंवाद उघड दिसून येत आहे. दरम्यान भाजप या परिस्थितीत कसल्याही प्रकारचं जकारण करत नाहीये. भाजप कोरोनाबाबत सरकारला सकारात्मक सूचना करत आहे. मात्र, आम्हालाही सरकार विश्वासात घेत नाही. आमचं ऐकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती असा टोला दरेकर यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.