रत्नागिरी - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण 57 ठिकाणी नाकांबदी करण्यात आली आहे. 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत 40 हजार 850 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी
संचारबंदीची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, 15 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत नाकांबदीच्या ठिकाणी एकूण वाहने 29 हजार 349 एवढी वाहने तपासली. तसेच नाकाबंदीच्या काळात वाहनामधील 51 हजार 892 एवढ्या लोकांची तपासणी केली. मोटार वाहन कायदा अंतर्गत एकूण 40 हजार 850 एवढे खटले दाखल केल्या व त्यातून 1 कोटी 6 लाख 10 हजार 700 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क न वापरणाऱ्यांकडून 21 लाख 98 हजार 400 दंड वसूल
मास्कचा वापर न करणाऱ्या 4 हजार 681 नागरिकांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याकडून 21 लाख 98 हजार 400 रुपये इतका दंड वसूल केला. तर जिल्ह्यात सात वाहने जप्त केली आहे. कोविडच्या अनुषंगाने दाखल केलेल्या गुन्ह्याची संख्या 79, तर विनाकारण फिरत असलेल्या 2 हजार 575 अशा नागरिकांची अँटिजन चाचणी केली. त्यामध्ये 183 नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
हेही वाचा - रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सुबोध मेडसीकर यांची नियुक्ती