ETV Bharat / state

लॉकडाऊन : कर्नाटकला निघालेले 70 मजूर रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात - Corona virus

मुळचे कर्नाटकातील असलेले आणि रस्त्यांच्या कामावर मजूर म्हणून काम करणारे जवळपास 70 मजूर आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावी चालले होते. पण, त्यांना काजरघाटी येथे पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्यांची सखोल तपासणी करत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Ratnagiri
कर्नाटकला निघालेले 70 मजूर रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Apr 1, 2020, 11:37 AM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अनेक लोक आता नवीन शक्कल लढवत नवीन मार्गाने आपल्या मूळ गावी परतण्याचा प्रयत्न करत आहे. असाच काहीसा प्रकार रत्नागिरीतल्या काजरघाटीमध्ये मंगळवारी संध्याकाळी उघड झाला.

कर्नाटकला निघालेले 70 मजूर रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात

मुळचे कर्नाटकातील असलेले आणि रस्त्यांच्या कामावर मजूर म्हणून काम करणारे जवळपास 70 मजूर आपल्या कुटुंबासह मूळ गावी चालले होते. त्यांना काजरघाटी येथे पोलिसांनी अडवले. त्यावेळी त्यांची सखोल तपासणी करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आपल्या मूळ गावी जाण्यापासून रोखण्यात आले असून त्यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळात असे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. हा काहीसा प्रकार आता रत्नागिरी येथे देखील समोर आला आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या कामगारांना आपल्या मूळगावी जाण्यापासून रोखण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.