ETV Bharat / state

शिवसेनेचे पाचही विद्यमान आमदार विनायक राऊतांना मताधिक्य देण्यात यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. विनायक राऊत यांच्या विजयात शिवसेनेच्या ५ आमदारांनी मोलाची भूमिका बजावली.

विनायक राऊत आणि नारायण राणे
author img

By

Published : May 24, 2019, 7:45 PM IST

रत्नागिरी - शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात तब्बल १ लाख ७८ हजार ३२२ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. राऊत यांच्या विजयात शिवसेनेच्या ५ आमदारांनी मोलाची भूमिका बजावली.

विनायक राऊत विजयानंतर जल्लोष साजरा करताना

रत्नागिरी जिल्ह्यातून राऊतांना चांगले मताधिक्य मिळाले. दीड लाखाच्या जवळपास मताधिक्य राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या ३ विधानसभा मतदारसंघातून मिळाले. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राऊत यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी हा विजय महत्वाचा आहे. दरम्यान, विनायक राऊत यांना ४ लाख ५८ हजार २२ तर, निलेश राणे याना २ लाख ७९ हजार ७०० आणि काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना ६३ हजार ३०० मतदान झाले. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जवळपास ९ लाख मतदारांनी मतदान केले होते. त्यातली ८ लाख ८७ हजार ३२५ मते वैध ठरली.

विधानसभा मतदारसंघानुसार आकडेवारी

१. चिपळूण विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना ८७ हजार ६३० तर, निलेश राणे ३० हजार ३९७ मते पडली. शिवसेनेच्या विनायक राऊत यांना ५७ हजार २३३ मतांची आघाडी मिळाली.

२. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना १ लाख १ हजार २५९ तर, निलेश राणे यांना ४१ हजार ७०० मते मिळाली. राऊत यांना रत्नागिरीतून ५९ हजार ५५९ मतांची आघाडी मिळाली.

३. राजापूर विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ७१ हजार ८९९ तर, निलेश राणे यांना ३३ हजार ७५५ मते मिळाली. राजापूर मतदारसंघातून राऊत यांना ३३ हजार ७५५ मतांची आघाडी मिळाली.

४. कुडाळ विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ६३ हजार ९०९ तर, निलेश राणे यांना ५५ हजार ७१६ मते मिळाली. कुडाळ मतदारसंघातून राऊत यांना ८ हजार १९३ मतांची आघाडी मिळाली.

५. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना ७४ हजार २२३ तर, निलेश राणे यांना ४४ हजार ८४५ मते मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना २९ हजार ३७८ मतांची आघाडी मिळाली.

६. कणकवली विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांना ६७ हजार ८२४ मते मिळाली. तर, विनायक राऊत यांना ५७ हजार ९३ मते मिळाली. या मतदारसंघात निलेश राणे यांना १० हजार ७१३ मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात निलेश राणे यांचे भाऊ नितेश राणे आमदार आहेत. मात्र, तरीही मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य निलेश राणे यांना मिळाले नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, ती सपशेल फोल ठरली. उलट, राऊत यांना २७ हजारांची आघाडी मिळाली. हा राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Intro:पाचही विद्यमान आमदार विनायक राऊतांना मताधिक्य देण्यात यशस्वी

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत तब्बल 1 लाख 78 हजार 322 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. मात्र विनायक राऊत यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती शिवसेनेच्या 5 विद्यमान आमदारानी.. हे पाचही आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघातून विनायक राऊत यांना मताधिक्य देण्यात यशस्वी झाले आहेत..
त्यातही रत्नागिरी जिल्ह्याने विनायक राऊत यांना चांगलं मताधिक्य दिलं.. दीड लाखाचं मताधिक्य राजापूर, रत्नागिरी, चिपळूण या तीन विधानसभा मतदारसंघातून मिळालं. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विनायक राऊत यांना 27 हजारांचं मताधिक्य मिळालं.. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेसाठी हा विजय महत्वाचा आहे.
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जवळपास 9 लाख मतदारांनी मतदान केलं होतं. त्यातली 8 लाख 87 हजार 325 मतं वैध ठरली..
दरम्यान विनायक राऊत यांना 4 लाख 58 हजार 22 तर निलेश राणे याना 2 लाख 79 हजार 700 आणि काँग्रेसच्या नवीनचंद्र बांदिवडेकर यांना 63 हजार 300 मतं पडली.. विधानसभा निहाय जर आकडेवारीचा विचार केला तर,
1) चिपळूण विधानसभा मतदारसंघात विनायक राऊत यांना 87630 तर निलेश राणे 30397 मतं पडली, म्हणजे चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 57 हजार 233 मतांची आघाडी मिळाली..
2) रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत 1 लाख 1 हजार 259 तर निलेश राणे यांना 41 हजार 700 मतं मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना 59 हजार 559 मतांचं मताधिक्य मिळाली.
3) राजापूर विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत 71 हजार 899 तर निलेश राणे यांना 33 हजार 755 मतं मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना 33 हजार 755 मतांचं मताधिक्य मिळाली.

4) कुडाळ विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत 63 हजार 909 तर निलेश राणे यांना 55 हजार 716 मतं मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना 8 हजार 193 मतांचं मताधिक्य मिळालं

5)सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना 74 हजार 223 तर निलेश राणे यांना 44 हजार 845 मतं मिळाली. या मतदारसंघातून राऊत यांना 29 हजार 378 मतांचं मताधिक्य मिळालं.

6) तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे यांना मताधिक्य मिळालं. या मतदारसंघात निलेश राणे यांना 67 हजार 824 मतं मिळाली तर विनायक राऊत यांना 57 हजार 93 मतं मिळाली.. या मतदारसंघात निलेश राणे यांना 10 हजार 731 इतकं मताधिक्य मिळालं.. या मतदारसंघात निलेश राणे यांचे भाऊ नितेश राणे आमदार आहेत. मात्र असं असतानाही या मतदारसंघातून अपेक्षित मताधिक्य निलेश राणे यांना मिळालं नाही..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निलेश राणे यांना आघाडी मिळेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ती सपशेल फोल ठरली.. उलट राऊत यांनी 27 हजारांची आघाडी सिंधुदुर्गत घेतली.. हा राणेंसाठी मोठा धक्का आहे.. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेची वाटचाल सोपी असेल, मात्र नारायण राणे यांना मात्र आता पुढची लढाई सोपी नसणार आहे...
Body:पाचही विद्यमान आमदार विनायक राऊतांना मताधिक्य देण्यात यशस्वी
Conclusion:पाचही विद्यमान आमदार विनायक राऊतांना मताधिक्य देण्यात यशस्वी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.