रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जास्तीत जास्त नुकसानग्रस्त कोकणाला मदत करतील, असा विश्वास व्यक्त करत विरोधकांवर शिवसेना प्रवक्ते तथा गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर ते रत्नागिरीत बोलत होते. यावेळी जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे देखील उपस्थित होते.
'विरोधकांचे संकटातही राजकारण'
यावेळी आमदार भास्कर जाधव म्हणाले, की गेल्या दीड वर्षांत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी सरकारच्या एकाही चांगल्या कामाचे कौतुक केलेले नाही. सरकारला कुठल्याही कामात मदत नाही, कोरोनाच्या संकटातही राजकारण सुरू आहे. त्यामुळे अशा माणसांच्या टिकेवर कोकणी माणूस विश्वास ठेवणार नाही. दरम्यान पंतप्रधान जरी देशाचे असले तरी ते फक्त गुजरात राज्याचाच विचार करतात, अशी टीकाही आमदार जाधव यांनी यावेळी केली. याच संदर्भात आमदार भास्कर जाधव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी. त्याचा व्हिडिओ पाहा..
हेही वाचा - विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे मी वैफल्यग्रस्त नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा - गडचिरोलीत पोलीस-नक्षल्यांदरम्यान चकमक, 13 नक्षल्यांना कंठस्नान