रत्नागिरी - कुंभार्ली घाटात मध्यरात्री गोवा बनावटीच्या दारुसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग-मुंबईच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.
गोपनीय माहितीवरून रचला सापळा..
गोवा बनावटीची दारू एका ट्रकमध्ये भरून दोघे जण नाशिकला घेऊन जात होते. राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाला याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने कुंभार्ली घाटात सापळा रचला. मध्यरात्रीच्या दरम्यान सदरचा ट्रक कराड चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाटात आला. यावेळी भरारी पथकाने शिताफीने हा ट्रक पकडला. यावेळी ट्रकसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांनतर खेर्डी येथील देवकर कंपनीत नेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात आढळून आली. हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. यावेळी ट्रक सहित युटिलिटी गाडी व दोघांना ताब्यात घेण्यात आले. रत्नागिरीत कडक लॉकडाऊन उठविल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क यांनी केली आहे.