ETV Bharat / state

Old Age Home Built In Ragnagiri: वयाच्या सत्तरीत उद्योजकाने उभारले सुसज्ज वृध्दाश्रम, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन - उद्योजकाने उभारले सुसज्ज वृध्दाश्रम

पालकर कुटुंबीयांनी सामाजिक वसा जोपासत 'सीनियर सिटीजन होम'ची संकल्पना चांगल्या प्रकारे राबवली आहे. अशासारखी सोय असावी पण ती प्रथा पडता कामा नये असे असं प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथे पालकर फाऊंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक विजय पालकर यांनी सिनिअर सिटीझन होमची (वृध्दाश्रम) उभारणी केली आहे. या भव्य वास्तूचा उद्घाटन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि संगमेश्वर-चिपळुणचे आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Old Age Home Built In Ragnagiri
मंत्री उदय सामंत वृद्धाश्रमाचे उद्‌घाटन करताना
author img

By

Published : Jan 24, 2023, 11:03 PM IST

रत्नागिरी : यावेळी उदय सामंत बोलत होते. यावेळी विजय पालकर, भारती पालकर, राहूल पालकर, राहूल पंडीत, प्रमोद पवार, श्रद्धा गुरव, बाबू साळवी , पदाधिकारी व ग्रामस्थ इ. उपस्थित होते. वयाच्या सत्तरीत पालकर दांपत्याने सामजिक बांधिलकेच्या जाणीवेतून अठरा खोल्यांचा सुसज्ज वृध्दाश्रम उभारला आहे. वयोवृद्धांची राहण्याची उत्तम सोय, शुद्ध, सात्विक, शाकाहारी आहार, प्रशिक्षित काळजीवाहू कर्मचारी वर्ग, आरोग्य कर्मचारी व रुग्णवाहिका सेवेसह, निसर्गाच्या सानिध्यात 18 खोल्यांचे प्रशस्त संकुल अशा सेवा या सिनिअर सिटीझन होमद्वारे दिल्या जाणार आहेत. वृध्द आजी-आजोबांसाठी वाचनालय, मनोरंजन, योगाभ्यास, लिप्ट अशा सोयी सुविधांयुक्त हे सिनिअर सिटीझन होम आहे. हा चांगला उपक्रम पालकर फाऊंडेशने राबवला आहे असे आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले. तसेच पालकर दांपत्याने सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या माळरानावर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे असं आमदार शेखर निकम यावेळी म्हणाले.

समाज भावनेतून हाती घेतला उपक्रम : मुळात शिक्षण, व्यवसाय हे मुंबईसारख्या माया नगरीत होवून सुध्दा वयाच्या 70 व्या वर्षी सुध्दा पालकर यांचे कार्य आणि उमेद तरुणांना लाजवणारी आहे. कोकणची लाल मातीने त्यांच्यातील कृतीशिलतेला साद घातल्यामुळे आणि पत्नीची आणि सुध्दा समर्थ साथ लाभल्यामूळे माळरानावर आनंदाचा आणि रोजगार निर्मितीचा मळा व वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम आपण फुलवू शकलो, असे विजय पालकर यांनी सांगितलं. समाज भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

ओसाड माळरानावर फुलवलं नंदनवन : विजय पालकर आणि भारती पालकर या दाम्पत्याने संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नजीकच्या विघ्रवली माळवाडी येथील तब्बल 12 एकर जागेतील ओसाड माळरानावर नंदनवन फुलवले आहे. या जागेवरील ओसाड माळरानावर असलेल्या पडीक चिरेखाणींचा सदुपयोग करत या चिरेखाणींमध्ये सिमेंट काँक्रीटची भिंत उभारून शेततळे उभारले आहे. या शेततळ्यांमध्ये पालू जातीच्या माशांची पैदास केली जात आहे. त्याचबरोबर येथील माळावर पालकर यांनी ऊस लागवड, कॉफी आदी पिकांची लागवड करून एक नवा प्रयोग केला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वीही झाला आहे. काळीमिरी व हळदीचे उत्पादनही ते घेत आहेत. शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन हे व्यवसायही त्यांनी या माळरानावर सुरू केले आहेत. त्यांचे हे कार्य तरूणांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे. देवरुखमधील 'सिनिअर सिटीझन होम' चे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा : Pune By Election :अजित पवार, जयंत पाटील घेणार उद्धव ठाकरेंची भेट, पोट निवडणुकीसंदर्भात होणार खलबत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.