ETV Bharat / state

#NisargaCyclone: कासवांच्या गावाची अपरिमित हानी; निसर्गाने दिलेलं 'निसर्ग'नेच नेलं ओढून

निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पर्यटन बंद झाले आहे. त्यातच वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे.

nisarga cyclone in ratnagiri
निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.
author img

By

Published : Jun 12, 2020, 6:53 PM IST

Updated : Jun 12, 2020, 8:13 PM IST

रत्नागिरी - निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पर्यटन बंद झाले आहे. त्यातच वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आता समोर येत आहे.

निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.

कासवांचं गाव म्हणून मंडणगड तालुक्यातील वेळास गाव प्रसिद्ध आहे. या गावाला रत्नागिरी जिल्ह्याचं शेवटचं टोक समजलं जातं. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण, जोडीला सागरी किनारा, नारळ आणि पोफळीच्या बागा, आंबा, काजू, फणसाच्या बागा असं निसर्ग सौंदर्याने हे गाव नटलंय. याला कासवांचे गाव म्हणून संबोधले जाते. या ठिकाणी कासवांचे संवर्धन करण्यात येते. दरवर्षी कासव महोत्सवही आयोजित केला जातो. त्यामुळे हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. अलीकडच्या काही वर्षांत वेळासचे पर्यटन वाढत होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे.

वादळामुळे घरांच्या नुकसानीसोबतच बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. हजारो झाडे या वादळात उखडली आहेत. त्यामुळे गाव 20 वर्ष मागे गेल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. वेळासमध्ये जवळपास 160 घरं आहेत. यातील 90 टक्के घरांचे नुकसान झाल्याचे आता समोर आले आहे. सध्या कासवांचा हंगाम असतो. आता वादळामुळे कासवांच्या विनी हंगामाला फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी जंगल असल्याने अनेक दुर्मिळ पक्षी वास्तव्य करतात. या अनेक दुर्मिळ प्रजातींची घरटी नेस्तनाबूत झाली आहेत.

nisarga cyclone in ratnagiri
निसर्ग चक्रीवादळानंतर किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.

पर्यटनामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, वादळामुळे सर्वच विस्कटल्याने उत्पन्नाचे साधन लोप पावले आहे. आता गावाला पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केलीय. यासाठी शासनाकडून तात्पुरती मदत मिळण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Last Updated : Jun 12, 2020, 8:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.