ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 'डेल्टा प्लस'चे 9 रुग्ण आढळल्याने खळबळ - रत्नागिरी जिल्ह्यात 'डेल्टा प्लस'चे 9 रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला डेल्टा प्लस व्हेरिएंट जबाबदार असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरीत डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक म्हणजे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार व्हेरीएंट ऑफ कंर्सन असं परिपत्रक आलेले आहे, त्यामध्ये डेल्टा प्लस असा उल्लेख नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे म्हणणे आहे.

-delta-plus-in-ratnagiri-
-delta-plus-in-ratnagiri-
author img

By

Published : Jun 23, 2021, 5:17 PM IST

Updated : Jun 23, 2021, 5:27 PM IST

रत्नागिरी - रत्नागिरीत नऊ रुग्ण डेल्टा प्लस'चे असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी याबाबत अधिकृतरित्या जाहीर केले असून तसा व्हिडिओ सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार व्हेरीएंट ऑफ कंर्सन असं परिपत्रक आलेले आहे, त्यामध्ये डेल्टा प्लस असा उल्लेख नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी म्हटले आहे. मात्र एकूणच जिल्ह्यातही या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.

डेल्टा प्लसच्या वृत्ताने खळबळ -

जिल्ह्यात पाच रुग्ण डेल्टा प्लसचे असल्याचे वृत्त रविवारी आले होतं. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी दुपारी तातडीने ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रूग्ण नसल्याचे सांगतानाच याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जाहीर केली जाईल असंही सांगितलं होतं. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यात डेल्टा प्लसचा एकही रुण नसल्याचा निर्वाळा दिला. तसेच राज्यातील कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांनीही रत्नागिरीत असा कुठला व्हेरिएंट आला नसल्याचे सांगितले होते.

रत्नागिरीत डेल्टा प्लसचे ९ रुग्ण
मात्र सोमवारी रात्री उशिरा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांचा या वृत्ताला दुजोरा देणारा व्हिडीओ आल्याने ते पाच रुग्ण डेल्टा प्लसचे असल्याच्या वृत्तावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. रत्नागिरीत ९ रुग्ण असल्याचे त्यांनी म्हटले होते.
जिल्हा शल्य चिकित्सक काय म्हणतात -
दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की, व्हेरीएंट ऑफ कंर्सन असं परिपत्रक आमच्याकडे आलेले आहे. त्यामध्ये डेल्टा प्लस असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही. मात्र आरोग्य मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये तथ्य असावे असेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान हे जे ९ रुग्ण आहेत, ते संगमेश्वरमधील आहेत.
सध्या संगमेश्वरमध्ये काय स्थिती ?
जिल्हा प्रशासनाने संगमेश्वर तालुक्यातील नावडी, कसबा, संगमेश्वर बाजारपेठ, म्हाबळे, धामणी आदी गावे प्रतिबंधित गावे म्हणून जाहीर करून या गावातील लोकांच्या बाहेर पडण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र कंटेंटमेंट झोन कोणत्या निकषावर आधारित आहे, याबाबत आम्हाला प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नाही, प्रशासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत नाही, असे इथल्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Last Updated : Jun 23, 2021, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.