ETV Bharat / state

Nilesh Rane: निलेश राणेंचे ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप - Nilesh Rane slammed Thackeray family

भाजप नेते निलेश राणे यांनी एका ट्विट मधून (Nilesh Rane tweet) ठाकरे कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. "चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा ठाकरे कुटुंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला, हे महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे" अशा आशयाचं ट्विट भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे. (Nilesh Rane slammed Thackeray family)

Nilesh Rane
निलेश राणे
author img

By

Published : Sep 30, 2022, 5:15 PM IST

रत्नागिरी: भाजप नेते निलेश राणे यांनी एका ट्विट (Nilesh Rane tweet) मधून ठाकरे कुटुंबीयांवर अत्यंत गंभीर असे आरोप केले आहेत. "चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा ठाकरे कुटुंबातील कुठल्या सुंदर व्यक्तीमुळे मर्डर झाला, हे महाराष्ट्राला एकदा कळलं पाहिजे" अशा आशयाचं ट्वीट भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी केलं आहे. (Nilesh Rane slammed Thackeray family)

प्रतिक्रिया देताना भाजप नेते निलेश राणे

ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना निलेश राणे म्हणतात,"महाराष्ट्राला काही गोष्टी कळल्या पाहिजेत यासाठी मी आज एक ट्विट केलं आहे. कधीकधी असे प्रसंग येतात की बोलल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. माँ साहेब जेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर गेल्या तेव्हा त्या कुठल्या परिस्थितीत गेल्या? का गेल्या? तेव्हा कर्जतच्या फार्म हाऊसवर कोण का नव्हतं? हे एकदा महाराष्ट्राला कळलं पाहिजे. पाठी फौजफाटा असणारे ठाकरे आणि तिथे औषध द्यायला कोणीही नाही, असं कधी घडू शकतं का? ठाकरेंनी फाटक्यात पाय घालू नये, एवढे फाडले जाल की शिवायला कोणी येणार नाही. ठाकरेंनी त्यांची औकात ओळखावी, ते शून्य झालेले आहेत, त्यांना कोण कुत्रं विचारत नाही. जे कुत्रे आमच्यावर भुंकायला ठेवले आहेत त्यांनाही आवरा, नाहीतर सभा घेऊन उभी-आडवी फाडेन हे लक्षात ठेवा. जर ठाकरे उगाच वायफळ बोलत बसले तर ऐश्वर्या ठाकरे कोण? सोनू निगम काय करत होता? या सगळ्या गोष्टी बाहेर निघणार हे ठाकरेंनी लक्षात ठेवावं"

निलेश राणे यांच्या या ट्विट नंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांच्या ट्विट मधील सुंदर व्यक्ती कोण? अशा आशयाचे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.