ETV Bharat / state

नवाब मलिक स्वतःलाच चावलेत, निलेश राणेंची पातळी सोडून टीका

author img

By

Published : Apr 18, 2021, 9:56 PM IST

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डिसीपी कार्यालयात दाखल झाले होते. यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे.

महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे

रत्नागिरी - ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डिसीपी कार्यालयात दाखल झाले होते. यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. नवाब मलीक यांनी फडणवीसांर टीका केली आहे. या टिकेवरून महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. नवाब मलिक स्वतःलाच चावलेत वाटतं, आदित्य ठाकरे तेंव्हाच्या मुंबई कमिशनरांना सुशांतसिंग राजपूतची केस चालू असताना का भेटायला जायचे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अधिकृत विषयासाठी पोलीसांना भेटले, असे राणे म्हणाले.

रेमडेसिवीररून आरोप-प्रत्यारोप

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रेमडीसीवीरचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. तर एकीकडे राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमधील नेत्यांमध्ये रेमडेसिवीवरून आरोप-प्रत्यारोपांचा जंगी सामना पाहायला मिळत आहे. दरम्यान ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड डिसीपी कार्यालयात दाखल झाले होते.

यावरून मंत्री यांनीही भाजपावर आरोप केले होते. नवाब मालिकांनी केलेल्या आरोपांना भाजपाच्या वतीने निलेश राणे यांनी चोख उत्तर दिले आहे. याबाबत ते ट्विट म्हणाले की, 'नवाब मलिक स्वतःलाच चावलेत वाटतं, कोरोनाच्या रुग्णांना आरोग्य सेवा चांगली देऊन रुग्णांचे जीव वाचवा' असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

नवाब मलिक स्वतःलाच चावलेत, निलेश राणेंची पातळी सोडून टिका

हेही वाचा- महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.