रत्नागिरी - जिल्ह्यात कडक लॉकडाऊन नंतरही कोरोना बाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 584 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात एकूण 18 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 3.45 टक्क्यांवर गेला आहे.
जिल्ह्यात 584 नवे रुग्ण -
रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात नव्याने 584 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 716 पैकी 408 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 850 पैकी 176 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 44 हजार 009 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्याचा मृत्युदर 3.45 टक्क्यांवर -
जिल्ह्यात 24 तासात 18 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 519 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर 3.45 टक्क्यांवर आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 444 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत 108 वर्षांच्या आजीची कोरोनावर यशस्वी मात