रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ३२४ नवे रुग्ण सापडले आहेत. तर चिपळूणमधील ३८ वर्षीय तरुणासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
बुधवारी दिवसभरात तब्बल ३२४ रुग्ण आढळले आहेत. दापोली तालुक्यात सर्वाधिक ८२ तर रत्नागिरी तालुक्यात ६५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने आरोग्य विभागासमोरील आव्हान वाढली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा-'राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भाभा अणू संशोधन केंद्र दूर करणार'
अशी आहे तालुकानिहाय रुग्णांची संख्या
बुधवारी आलेल्या ९७५ जणांच्या अहवालात ३२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ६५१ अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या ३२४ रुग्णांमध्ये रत्नागिरी ६५, दापोली ८२, खेड ३५, गुहागर ५१, चिपळूण ५७, संगमेश्वर १२, मंडणगड १०,लांजा ३, राजाापूर ९ रुग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा-हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटला पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिली मंजुरी
सात जणांचा मृत्यू-
जिल्ह्यात आजपर्यंत १३ हजार ६२१ जण पॉझिटिव्ह झाले आहेत. तर सध्या १६२८ जण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचारात घेत आहेत. दिवसभरात ६६ जणांना कोरोना मुक्त करून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत तब्बल ११ हजार २९९ बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज सात जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या ४१५ झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील दोन पुरुषासह एका महिलेचा सामावेश आहे. दापोली तालुक्यात एक पुरुष, लांजा तालुक्यात एक पुरुष व तर चिपळूणमधील ३८ वर्षीय तरूणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.