रत्नागिरी - अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरएफच्या 4 टीम दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या ठिकाणी प्रत्येकी एक टीम आहे.
पुरजन्य भागाची पहाणी
ज्याठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशा ठिकाणची पाहणी एनडीआरएफकडून केली जात आहे. या चार टीमचं नेतृत्व डेप्युटी कंमांडन्ट राकेश मिश्रा करत आहेत. तर रत्नागिरीतील टीमचं नेतृत्व इन्सपेक्टर शिवप्रसाद राव करत आहेत. 5 महाराष्ट्र बटालीयन पुण्यातील ही टीम आहे. रत्नागिरीतील पुरजन्य भागात या टिमने आज रेकी केली. त्याचबरोबर ज्या भागात दरड कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्या ठिकाणची पाहणी देखील एनडीआरएफच्या टीमने केली आहे. मुसळधार पावसामुळे जर कोणती आपत्ती आली तर, त्यासाठी एनडीआरएफच्या टीम पुर्णपणे सज्ज झाल्या आहेत.