रत्नागिरी - नाणार रिफायनरी समर्थक आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. तर रिफायनरी विरोधकांचा मोर्चा मात्र रद्द करण्यात आला आहे. रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधक मोर्चा काढणार होते. कोकण भूमिकन्या महामंडळाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात येणार होता.
रिफायनरी विषय संपलेला आहे, तुम्ही ताकद वाया का घालवता, असा सल्ला पालकमंत्र्यांनी दिल्याने कोकण भूमिकन्या महामंडळाकडून मोर्चा रद्द करण्यात आला आहे. रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी रत्नागिरी, राजापूरमधील बाजारपेठा बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.