रत्नागिरी - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात शनिवारी नाणार रिफायनरी संदर्भात जाहिरात छापून आली. त्यानंतर राज्यातील जनतेत आणि राजकारणात खळबळ उडाली. सुरुवातील नाणार रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेने आपली भूमिका बदलल्याची चर्चा रंगली. मात्र, या प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे.
हेही वाचा - "नाणारचं गाडलेलं भूत पुन्हा काढलं जाणार नाही"
कोकणातील जनतेचा या प्रकल्पाला कधीच पूर्ण विरोध नव्हता. विरोध असता तर हजारो शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ अर्ज दिले नसते. कोकण दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोकणाच्या जनतेला प्रकल्पासंदर्भात गोड बातमी द्यावी, असे मत कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या अविनाश महाजन यांनी व्यक्त केले आहे.