ETV Bharat / state

Dhopeshwar refinery project धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प संदर्भात अभ्यास करून भूमिका जाहीर करू- नाना पटोले - We will study and announce the position

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) हे आज धोपेश्वर रिफायनरीबाबत (Ratnagiri Dhopeshwar refinery project) नेमकी वस्तूस्तिथी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी राजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी रिफायनरी समर्थकांची व विरोधकांची भेट घेतली आणि आपली भूमिका त्यांना सांगितली. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प संदर्भात अभ्यास करून; नंतर भूमिका जाहीर केली जाईल (We will study and announce the position), असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. ते आज राजापूरमध्ये बोलत होते.

Dhopeshwar refinery project
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Sep 11, 2022, 7:57 PM IST

रत्नागिरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole) हे आज धोपेश्वर रिफायनरी बाबत (Ratnagiri Dhopeshwar refinery project) नेमकी वस्तूस्तिथी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी राजापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी रिफायनरी समर्थकांची व विरोधकांची भेट घेतली आणि आपली भूमिका त्यांना सांगितली. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प संदर्भात अभ्यास करून; नंतर भूमिका जाहीर केली जाईल (We will study and announce the position), असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. ते आज राजापूरमध्ये बोलत होते.

समर्थकांनी घेतली नाना पाटोलेंची भेट : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज धोपेश्वर रिफायनरीबाबत नेमकी वस्तूस्तिथी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी राजापूरमध्ये आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली आणि आपली भूमिका त्यांना सांगितली. यावेळी नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष हा विकासासोबत राहिलेला आहे आणि राहणार असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना नाना पटोले

विरोधकांची घेतली नानांनी भेट : त्यानंतर नाना पटोले गोवळ येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले. मोठ्या संख्येने इथे रिफायनरी विरोधक उपस्थित होते. त्यात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रिफायनरी विरोधकांनी मांडली.

रिफायनरी याबाबतची भूमिका पुढच्या काळात स्पष्ट करू : यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, याबाबत सर्व गोष्टी तपासून हा रिफायनरी प्रकल्प मानवी जीवनासाठी हानिकारक असेल. निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी पोचत असेल, तर काँग्रेस त्याला नक्कीच विरोध करेल. काँग्रेसला मानवी जीवन संपून आणि निसर्ग उद्धवस्त करून विकास नको. त्यामुळे सर्व बाबी तपासून दोन्ही बाजूच्या लोकांना आमने-सामने बसवून याला समर्थन असेल व समर्थन करू, आणि मानवी जीवन, पर्यावरण उध्वस्त होत असेल तर विरोध करू. याबतच्या सर्व तांत्रिक बाजू तपासून याबाबतची भूमिका पुढच्या काळात स्पष्ट करू, अशी भूमिका यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

विरोधकांकडून नानांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त नाना पटोले यांनी मांडलेली भूमिका समाधानकारक नसल्याचे म्हणत, रिफायनरी बाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. नाणारमध्ये काँग्रेसने विरोध केला, मग आता रिफायनरी तीच आहे, मग आता परत विचार काय करणार? असे म्हणत नानांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.