ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात 'माझं गाव, माझी जबाबदारी' मोहिम; २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण

रत्नागिरी जिल्हयात (01जून)पासून 'माझं गाव माझी जबाबदारी' ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सोबतच गृहविलगीकरण बंद करुन, ग्राम कृती दलांच्या मदतीने 200 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात 'माझं गाव, माझी जबाबदारी' मोहिम; २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण
रत्नागिरी जिल्ह्यात 'माझं गाव, माझी जबाबदारी' मोहिम; २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण
author img

By

Published : Jun 1, 2021, 3:20 AM IST

रत्नागिरी - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात (01जून)पासून 'माझं गाव माझी जबाबदारी' ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सोबतच गृहविलगीकरण बंद करुन, ग्राम कृती दलांच्या मदतीने 200 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ही माहिती दिली. याबाबत तालुकास्तरीय महसूल तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी दृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आपण आता एका निर्णायक टप्प्यावर असून, यावेळी मोठया प्रमाणावर कृतीद्वारे आपण दूसऱ्या लाटेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड हे उपस्थित होते.

'कॉन्टॅक्ट ट्रेसींग'

दिवसाला साधारण 500 रुग्ण आज जिल्हयात आढळून येत आहेत. या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे. असे, उद्दीष्ट ठरवून तालुक्यांच्या ठिकाणी मोबाईल तपासणी पथके कार्यान्वीत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले आहेत.
2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावात शाळा, मंगल कार्यालये अशा जागांवर संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था करणे, तसेच तपासणी झालेल्या व्यक्तीला तपासणीचा रिझल्ट प्राप्त होईपर्यंत इतरांमध्ये मिसळू न देणे, या बाबी केल्या जातील. दरम्यान, यासाठी काही कमी लोकसंख्येच्या गावांनी पुढाकार घेतला तरी त्यांना संमती द्यावी. तसेच, जिल्हयात सर्वत्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी रत्नागिरी शहराप्रमाणे मोबाईल लसीकरण सुरु करणे, नोकरी निमित्ताने अथवा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन, खात्री पटल्यावर पात्र व्यक्तींचे लसीकरण विना अपॉईन्टमेंट करण्याबाबतही त्यांनी यावेळी सूचना केल्या आहेत.

'जिल्हा प्रवेश बंदी'
योग्य कारणाखेरीज जिल्हा प्रवेश बंदी करणारे आदेश (२ ते ८ जुन २०२१) दरम्यान लागू राहणार आहेत. या काळात सर्व जिल्हा सिमा मार्गावर तपासणी नाके लावण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.