ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासांनी पूर्वपदावर

खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरच्या या जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. ही वाहतूक आता 8 तासांनी पूर्वपदावर आली आहे.

रत्नागिरी
author img

By

Published : Jul 11, 2019, 9:40 AM IST

Updated : Jul 11, 2019, 12:23 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरच्या जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल ८ तासानंतर वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. आज पहाटे ४ वाजल्यापासून वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

जगबुडी आणि वाशिष्ठी या दोन्ही पुलावरून आता वाहतूक सुरू झाली आहे. बुधवारी रात्री 8 च्या सुमारास जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे समजताच खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव तसेच पोलिसांनीही पुलाकडे धाव घेतली. नदीच्या एकूण पाणीपातळीचा अंदाज घेऊन हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Intro:रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

पाहटे 4 वाजता वाहतूक सुरू

8 तासांनी वाहतूक सुरू

जगबुडी आणि वाशिष्ठी या दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने 8 वाजता वाहतूक करण्यात आली होती बंदBody:रत्नागिरीConclusion:रत्नागिरी
Last Updated : Jul 11, 2019, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.