रत्नागिरी -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे चांगले चांगले परिणाम महाराष्ट्राला मिळतील अशी अपेक्षा खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे. ये रत्नागिरीत बोलत होते. मराठा आरक्षणा बरोबरच इतरही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
भेटीमुळे महाराष्ट्राला चांगले परिणाम
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे उच्चस्तरीय शिषटमंडळ मोदींबरोबर चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्राचे इतर प्रश्न देखील महत्वाचे आहेत. खासकरुन 30 हजार कोटी इतका जीएसटी केंद्राकडून महाराष्ट्राला येणे बाकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीचा पुरवठा योग्य पद्धतीने महाराष्ट्राला करावा ही एक प्रमुख मागणी आहे, तसेच वादळात नुकसान झालेल्या बाधितांना जुने निकष बदलून नुकसान भरपाई मिळावी, असे विविध प्रश्न आज मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मांडणार आहेत. या भेटीमुळे चांगले परिणाम महाराष्ट्राला मिळतील, अशी अपेक्षा खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.