रत्नागिरी - मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट प्रिमॅच्युअर असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत केले होते. या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
..म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा जळफळाट झाला आहे - खासदार विनायक राऊत
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट प्रिमॅच्युअर असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत केले होते. या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
MP Vinayak Raut criticizes Devendra Fadnavis
रत्नागिरी - मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट प्रिमॅच्युअर असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीबाबत केले होते. या वक्तव्याचा खासदार विनायक राऊत यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना पोटशूळ उठण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची भेट. त्यांना डावलून हे दोघे एकत्र येताहेत. त्यामुळे आपण कुठेतरी अडगळीत पडले जाऊ, आपण कुठेतरी बाहेर फेकलो जाऊ, ही भिती त्यांच्या मनामध्ये असल्याने त्यांचा जळफळाट झालेला असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.
शंका घेणाऱ्यांना शंका घेऊ दे -
दरम्यान पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीवर बोट ठेवणाऱ्या मनसे आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांनाही चोख उत्तर दिलं आहे. शंका घेणाऱ्यांना शंका घेऊ दे, परंतु पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जी चर्चा झाली त्यातून महाराष्ट्राच्या हिताचेच प्रश्न सोडवले जातील, याबद्दल आम्हाला खात्री असल्याचे खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले.

Last Updated : Jun 9, 2021, 3:14 PM IST