ETV Bharat / state

रत्नागिरीमध्ये आतापर्यंत 708 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णांची संख्या 415 - ratnagiri corona cases

दापोली येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण रत्नागिरी येथे भरती होता. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता 41 झाली आहे.

ratnagiri corona update
रत्नागिरीमध्ये आतापर्यंत 708 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णांची संख्या 415
author img

By

Published : Jul 19, 2020, 9:31 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 34 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 164 झाली आहे. दरम्यान 26 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 708 झाली आहे. शनिवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोविड रुग्णालय येथून 13, कोविड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 5, उपजिल्हा रुग्णालय कामथे 3, कोविड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 1 आणि 4 समाजकल्याण रत्नागिरी मधील आहेत. एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 415 आहेत.

दापोली येथील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. हा रुग्ण रत्नागिरी येथे भरती होता. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या आता 41 झाली आहे. तसेच मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 12 हजार 970 इतकी आहे.

संस्थात्मक विलगीकरण कक्ष असलेल्या रुग्णालयांची स्थिती -

सामान्य रुग्णालय, रत्नागिरी - 64, कोविड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी - 1, उपजिल्हा रुग्णालय, कामथे - 4, कोविड केअर सेंटर पेढांबे 7, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी - 2, कोविड केअर सेंटर, घरडा, लवेल - 4, ग्रामीण रुग्णालय गुहागर -1, केकेव्ही, दापोली - 22 असे एकूण 105 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 559 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 12 हजार 820 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1164 अहवाल पॉझिटिव्ह आले असून 11 हजार 847 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 540 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 540 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. यामध्ये घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबचे आकडे समाविष्ट नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.