रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी पाचशेवर गेली आहे. आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 515 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 515 पैकी 308 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 207 रुग्ण अँटिजेन चाचणी केलेले आहेत. तर आज जिल्ह्यात तब्बल 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला -
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. सुरुवातीला 100, नंतर 200, नंतर 300, नंतर 400 आणि आता तर 500 पेक्षा जास्त रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे दिसून येत .
दरम्यान गेल्या 24 तासात 515 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 15 हजार 75वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 308 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 207 रुग्ण अँटिजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात आज सापडलेल्या 515 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 114, दापोली 16, खेड 80, गुहागर 36, चिपळूण 179, संगमेश्वर 41, मंडणगड 2, राजापूर 27 आणि लांजा तालुक्यात 20 रुग्ण सापडले आहेत .
10 जणांचा मृत्यू -
मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात कोरोना मृत्यूंची संख्या 439 एवढी झाली आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.91% आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 77.31 टक्के आहे.