रत्नागिरी - जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहर पाण्यात गेले होते. येथील रहिवाशी नागरिकांचे संसार पाण्यात जाण्यासह व्यापाऱ्यांच्या दुकानांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे दौरे झाल्यानंतर सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मात्र अनेक अटी आणि शर्तीमुळे चिपळूणमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना शासकीय मदत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना सरसकट मिळावी यासाठी मदतीचे निकष बदलावेत यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. मदतीसाठी जाहीर झालेले निकष बदलण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निकम यांना साकडे घातले आहे.
शासनाच्या या नियम अटींमुळे जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत नुकसान झालेल्या बाधित नागरिकांना, व्यवसायधारकांना मदत मिळणे गरजचे आहे. त्या दृष्ठीने शासन स्तरावर तरतुद करून याबाबत सहानूभूतीपुर्वक विचार व्हावा, अशी विनंती आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केली आहे. त्याबाबत आमदार निकम यांनी पत्रव्यवहार केला आहे. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री यांनाही याबाबत आमदार शेखर निकम यांनी निवेदन दिलेले आहे.
हेही वाचा -चिपळूण एसटी स्टँड परिसर पाण्याखाली, कधी नव्हे एवढं पुराचं पाणी...
हेही वाचा - पुढील पाच दिवस पावसाचे.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट